सर्व म्युच्युअल फंड्स मध्ये जोखीम असते का?

सर्व म्युच्युअल फंड्स मध्ये जोखीम असते का?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीमध्ये जोखीम असते, फक्त त्याचे स्वरूप आणि प्रमाण बदलते. हे म्युच्युअल फंड्सना देखील लागू होते.

जेव्हा गुंतवणुकीमधील परताव्यांचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व म्युच्युअल फंड्स स्किम्स मध्ये सारखीच जोखीम नसते.

इक्विटी स्किम्स मध्ये दीर्घ काळात अधिक परतावे देण्याची क्षमता असते, ज्यामुळे संपत्ती निर्माण होऊ शकते. लक्षात ठेवा, चलनवाढ ही जोखीम आहे आणि इक्विटीज हा चलनवाढीचा सामना करण्यासाठी असलेला सर्वोत्तम मालमत्ता वर्ग आहे. म्हणून एका अर्थी काही जोखमी पत्करणे हे फायद्याचे ठरते.

दुसर्‍या बाजूला इक्विटी फंड्सशी तुलना करता लिक्विड फंड्सशी निगडीत जोखीम ही त्यामानाने कमी असते. लिक्विड फंड कमी जोखीम घेऊन भांडवलाचे संरक्षण करण्यास आणि घेतलेल्या जोखमीच्या प्रमाणात परतावे निर्माण करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. 

त्याचबरोबर फक्त परताव्यांमधील जोखीमच विचारात घ्यायला हवी असे नाही, देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. येथे इतर जोखमी देखील असतात जसे – रोख रकमेत रुपांतर होण्याची जोखीम (लिक्विडीटी रिस्क). लिक्विडीटी रिस्क आपली गुंतवणूक रोख रकमेत सहज बदलण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करते. म्युच्युअल फंड्स मध्ये ही जोखीम सर्वात कमी असते.

शेवटी जोखमीचे स्वरूप आणि व्याप्ती ही स्किम विषयी योग्य समज आणि मूल्यमापन आणि एका चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाचा किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला यामधून चांगल्याप्रकारे समजते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे