डेब्ट फंड्स हे मुदत ठेवीं सारखे असतात का?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा आपण आपले पैसे मुदत ठेवी मध्ये (एफडी) ठेवता, तेव्हा बँक त्यावर परतावा म्हणून एका निश्चित दराने व्याज देण्यासाठी वचनबद्ध असते. याचा अर्थ आपण बँकेला पैसे उसने देत आहात आणि बँक आपल्याकडून कर्ज घेत आहे, त्यामुळे बँक आपल्याला निश्चित व्याज देण्यास बांधिल असते. डेब्ट म्युच्युअल फंड्स हे सरकारी बाँड्स, कंपनी बाँड्स, रोखे बाजारातील सिक्युरिटीज अशा डेब्ट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. वीज कंपनी, बँका, गृहकर्ज कंपनी आणि शासन यासारख्या कॉर्पोरेट संस्था बाँड जारी करतात. बाँड जारी करणाऱ्या संस्था, त्यांच्या गुंतवणूकदारांना (म्हणजे बाँड खरेदी करणाऱ्यांना) त्यांनी बाँडमध्ये गुंतवलेल्या पैशावर ठराविक कालावधीमध्ये व्याज देण्याचे वचन देतात. 

आपल्या एफडीच्या उदाहरणाप्रमाणे बाँड जारी करणाऱ्या संस्था बँकांसारख्या आहेत, ज्यांना आपण पैसे उसने दिले आहेत आणि ते त्यावर व्याज देण्यास वचनबद्ध आहेत. जसे आपण बँक एफडीमध्ये गुंतवणूकदार आहात, तसेच बाँड्ससाठी डेब्ट फंड्स हे गुंतवणूकदार आहेत. जसे आपल्याला एफडीवर व्याज मिळते, तसेच डेब्ट फंड्सना त्यांनी खरेदी केलेल्या बाँडच्या पोर्टफोलिओ वर ठराविक कालावधीने व्याज मिळते. जसे एफडीवर स्थिर दराने खात्रीशीर व्याज मिळते, तसे ह्या बाँड्सवर फिक्स्ड इन्कम डेब्ट फंड्सना ठराविक कालावधीने मिळणारे व्याज हे कोणत्याही खात्री शिवाय स्थिर दराने किंवा बदलत्या दराने मिळू शकते. जेव्हा ते त्यांच्या पोर्टफोलिओतील बाँड विकतात, तेव्हा त्यांना त्यांचे मुद्दल परत मिळते. जेव्हा आपण एखाद्या फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपली गुंतवणूक अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बाँड पोर्टफोलिओमध्ये होत असते, ज्याने अनेक बाँड जारीकर्त्यांमध्ये जोखीम विभागली जातो. अशा जोखीम विभागणीचा फायदा आपल्याला होतो.

460
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे