मला कुठल्याही दिवशी पैसे काढता येतील, का मला विशिष्ट दिवशीच पैसे काढता येतील?

मला कुठल्याही दिवशी पैसे काढता येतील, का मला विशिष्ट दिवशीच पैसे काढता येतील?

म्युच्युअल फंड सही आहे?

ओपन एन्ड फंडमधून सर्व कार्यालयीन दिवसांमध्ये रक्कम काढून घेण्याची परवानगी असते. कार्यालयीन-दिवसांशिवाय एखाद्या दिवशी जर रक्कम काढण्याचा अर्ज गुंतवणूकदाराने सेवा केंद्रावर दिला, किंवा एका विशिष्ट वेळेनंतर, जसे दुपारी 3:00 नंतर, दिला, तर तो पुढच्या कार्यालयीन-दिवशी विचारात घेतला जातो. त्या दिवसाच्या निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही)च्या आधारे रक्कम काढण्याची प्रक्रिया केली जाते. एका विशिष्ट कालावधी मध्ये विक्री केल्यानंतर, आलेली संपूर्ण रक्कम गुतंवणूकदाराच्या बँक खात्यामध्ये साधारणपणे 10 कार्यालयीन दिवसांमध्ये जमा केली जाते.

स्किमचा फोलिओ नंबर स्पष्टपणे लिहीलेला आणि सही केलेला विक्री करण्याचा अर्ज सुपूर्त करून रक्कम काढण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांकडे असलेल्या आवश्यक सुरक्षा कोड नुसार, रक्कम काढण्यासाठीचा अर्ज मान्यता प्राप्त ऑन-लाईन प्लॅटफॉर्मवरून सुद्धा केला जाऊ शकतो .

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ईएलएसएस) साठी 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, आणि त्यानंतर त्यांतून कुठल्याही कार्यालयीन दिवशी रक्कम काढता येऊ शकते.

असामान्य परिस्थितींमध्येच रक्कम काढण्यावर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. जर रोख रकमेची समस्या असली, भांडवल बाजार बंद असला, कार्यात्मक संकट असले किंवा सेबीकडून तसे निर्देश असतील, तर विश्वस्त मंडळाकडून अनुमती मिळाल्यावर AMC काही निर्बंध घालू शकते. इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अशी परिस्थिती क्वचितच येते.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे