भारतीय म्युच्युअल फंड्स फक्त भारतातच गुंतवणूक करतात का?

भारतीय म्युच्युअल फंड्स फक्त भारतातच गुंतवणूक करतात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

बहुतेक सर्व म्युच्युअल फंड्स भारतातच गुंतवणूक करत असले तरी , येथे अशा काही थोड्या स्किम्स आहेत ज्या भारताबाहेरील सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात.

सर्व म्युच्युअल फंड्स स्किम्सना भारतामधील गुंतवणूकदारांना युनिट्स उपलब्ध करून देण्याआधी सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्या मान्यतेची गरज असते. सेबी स्किमच्या माहितीच्या दस्तऐवजांची (SID) छाननी केल्यानंतर मान्यता देते. या दस्तऐवजांमध्ये मध्ये स्किमच्या गुंतवणूकीच्या उद्दिष्टांची, ते ज्या प्रकारच्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांची, ज्या देशांत ज्या भागात गुंतवणूक करत आहेत आणि प्रत्येक सिक्युरिटीशी निगडीत असलेल्या जोखमीची स्पष्ट माहिती दिलेली असते. 

प्रत्यक्षात अशा विदेशी सिक्युरिटीज मध्ये भाग घेण्यासाठी येथे दोन मार्ग आहेत. स्किम्स विदेशी एक्स्चेंजच्या यादीत असलेल्या किंवा ते ट्रेड करत असलेल्या सिक्युरिटीज खरेदी करु शकतात, किंवा सेबी कडून वेगळी मान्यता घेतल्यानंतर , त्या अशा विदेशी म्युच्युअल फंड्स स्किम्स मध्ये गुंतवणूक करू शकतात, ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा सिक्युरिटीज आहेत. यापैकी कोणत्याही पद्धतीने त्या स्किमच्या पोर्टफोलिओमध्ये विदेशी स्वाद आणता येतो.

भारताबाहेरील सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केल्यानंतर देखील, भारतीय म्युच्युअल फंड्सना दर दिवशी नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूज देणे, पोर्टफोलिओ सादर करणे, लिक्विडीटी देणे यासारख्या गोष्टी बंधनकारक असतात. थोडक्यात त्यांना सेबीच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. अशा स्किम्स साठी फक्त त्यांच्या विदेशी सिक्युरिटीज मधील गुंतवणुकींसाठी एक समर्पित आणि वेगळा फंड व्यवस्थापक असणे गरजेचे आहे.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे