म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीचे बँकेत खाते असणे गरजेचे असते का?

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीचे बँकेत खाते असणे गरजेचे असते का?

म्युच्युअल फंड सही आहे?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची तर लक्षात ठेवा की आपले एखाद्या बँकेत खाते, केवायसी /सीकेवायसी, पॅन आणि आधार कार्ड असणे सक्तीचे आहे. काही फसव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडचा वापर पैशाची अफरातफर करण्यासाठी करू नये ह्यासाठी हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. काही म्युच्युअल फंड आणि बँकांची मुख्य कंपनी एकच आहे म्हणजे ते एकाच समूहाशी संलग्न आहेत. पण, बँका ह्या आरबीआयच्या अधिपत्याखाली येतात आणि म्युच्युअल फंड्स वर सेबीचे नियंत्रण असते. अनेक ठिकाणी आपल्याला एका सुस्थापित बँ आणि म्युच्युअल फंड एकाच ब्रँडचे असल्याचे दिसून येते, लक्षात घ्या, की त्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या स्वतंत्रपणे काम करत आहेत. आपल्याला बँकेशी संलग्न असलेल्या कंपनीच्या फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या बँकेत बचत खाते असण्याची आवश्यकता नसते. येथे ती कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी


काही बँका देखील विविध म्युच्युअल फंड्ससाठी वितरक म्हणून काम करतात आणि ते फंड्स त्यांच्या ग्राहकांना क्रॉस सेल करतात. कदाचित ते बाजारात उपलब्ध असलेले सगळे म्युच्युअल फंड्स विकत नसतील, पण ते ज्या म्युच्युअल फंड्स बरोबर ते वितरक म्हणून संलग्न आहेत, अशा फंड्ससाठी त्या काम करतात. आपण विक्री करत असलेल्या बँकेशी संलग्न नसलेल्या म्युच्युअल फ़ंड्समध्ये म्हणजेच आपले खाते ज्या बँकेत आहे त्या खात्यातून देखील गुंतवणूक करू शकता.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे