मी नियमितपणे माझ्या गुंतवणुकींवर लक्ष कसे काय ठेवू शकतो?

मी नियमितपणे माझ्या गुंतवणुकींवर लक्ष कसे काय ठेवू शकतो? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

गुंतवणुकदारांना कायम एक प्रश्न सतावत असतो की मी माझ्या गुंतवणुकीच्या प्रगतीवर कसे लक्ष ठेवू

हे म्हणजे क्रिकेटमधल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासारखे आहे. क्रिकेटच्या सामन्यामध्ये,नंतर बॅटिंग करणा-या संघाला सगळी गणिते माहिती असतातकिती धावा,किती गडी आणि किती षटके.

हेच आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूक करताना सुद्धा लक्षात घ्यावे लागते. आर्थिक उद्दिष्टे म्हणजे लक्ष्य असलेली धावसंख्या आहे असे समजा-

  1. जी रक्कम आपल्याकडे आजपर्यंत जमा आहे, ती आपली आत्ता पर्यंतची धावसंख्या आहे समजा.
  2. जी रक्कम साध्य करायची आहे ती धाव संख्येचे लक्ष्य आहे, आणि उरलेला वेळ म्हणजे उरलेली षटके.
  3. विकेट्सची स्थिती आणि गोलंदाजांच्या दर्जाची वेगवेगळ्या धोक्यांच्या पातळीवर तुलना केली जाऊ शकते- मग ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी असेल, देशातील राजकीय स्थितीशी असेल, आंतरराष्ट्रीय भांडवलाचा वेग असेल, कायद्यातील बदल असतील, कर आणि नियमावली इत्यादींशी संबंधित असू शकेल.
  4. ह्या ठिकाणी धावफलक म्हणजे आपण म्युच्युअल फंड स्किम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जो खात्याचा ताळेबंद हिशोब (अकाऊंट स्टेटमेंट) मिळेल
  5. काही ऑनलाईन साधने आणि मोबाईल अ‍ॅप्स आहेत ज्याआधारे आपण आपल्या गुंतवणूकीचे मूल्य म्हणजेच धावफलक तपासू शकता.
459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे