मला एका कंपनीच्या फंडमधून गुंतवणूक काढून घेऊन ती दुसऱ्या कंपनीच्या फंडमध्ये गुंतवण्यासाठी काय करता येईल?

मला एका कंपनीच्या फंडमधून गुंतवणूक काढून घेऊन ती दुसऱ्या कंपनीच्या फंडमध्ये गुंतवण्यासाठी काय करता येईल?

म्युच्युअल फंड सही आहे?

गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक अधिक चांगल्या आर्थिक नियोजनासाठी एकाच कंपनीच्या फंड हाऊस मध्ये एका ओपन एंडेड फंड मधून दुसर्‍या फंड मध्ये स्थलांतर करतात. एकाच फंड हाऊस मध्ये स्थलांतर करण्यासाठी, स्थलांतरणाचा अर्ज भरा. त्यावर ज्या स्किममधून स्थलांतरित करावयाची रक्कम/ युनिट्सची संख्या आणि ज्या स्किम मध्ये स्थलांतर करायचे आहे तिचे नाव भरा. स्किम मध्ये प्रवेश करताना आणि स्किममधून बाहेर पडताना, दोन्ही वेळा आपल्याला कमीत कमी गुंतवणूक रकमेचे निकष पूर्ण करावे लागतील. स्थलांतरण करताना काही वेळा एक्झिट लोड (निर्गमन भार) आणि कॅपिटल गेन टॅक्स (भांडवल नफा कर) लागू शकतो. एकाच फ़ंड हाऊसमधील स्किम मध्ये स्थलांतर करताना आपल्याला मुदतपूर्तीच्या कालावधीबाबत काळजी करण्याची गरज नसते कारण आपले पैसे फंड हाऊसच्या बाहेर जात नाहीत.

जेव्हा आपण म्युच्युअल फंड अ मधील स्किममधून म्युच्युअल फंड ब च्या स्किम मध्ये स्थलांतर करता, हे म्हणजे आपली गुंतवणूक एका फंड मधून विकून दुसर्‍या फंड मध्ये पुन्हा गुंतवण्यासारखे आहे. आपण पहिल्या म्युच्युअल फंड मधून रक्कम मिळवण्यासाठी अर्ज करू शकता आणि ती रक्कम आपल्या बँक खात्यात येईपर्यंत वाट बघू शकता. आपल्या गुंतवणुकीमधून रक्कम काढून घेताना एक्झिट लोड (निर्गमन भार) आणि कर ह्यांचा विचार केला गेला पाहिजे. आपल्या पहिल्या फंड मधील रक्कम जमा झाली की आपल्याला ज्या म्युच्युअल फंड मध्ये पुन्हा गुंतवणूक करायची आहे त्यासाठी अर्ज भरा. आपणास दुसऱ्या कंपनीच्या फंडमध्ये गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन हवे असल्यास वित्त तज्ञांची मदत घेऊ शकता.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे