अ‍ॅसेट क्लास शिवाय, म्युच्युअल फंड्स स्किम्सची वर्गवारी करण्याच्या पद्धती काय आहेत

अ‍ॅसेट क्लास शिवाय, म्युच्युअल फंड्स स्किम्सची वर्गवारी करण्याच्या पद्धती काय आहेत zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

आयुष्य वैविध्यपूर्ण असायला हवे. पण तसे असताना ही, फक्त मजा म्हणून वैविध्य नको. काही ठिकाणी वैविध्य असायला हवे कारण त्या परिस्थितीमध्ये त्याची गरज असते. तसेच, जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपल्याला समतोल साधावा लागतो. अन्न आपल्या शरीराच्या काही मूलभूत गरजा भागवत असते - त्यात महत्त्वाची पौष्टिक तत्त्वे असतात: आपल्याला ऊर्जेची गरज असते, जोमाची गरज असते, ताकदीची गरज असते, आपली दृष्टी चांगली असायला हवी - हे सर्व आपल्याला महत्त्वाच्या पौष्टिक तत्त्वांमुळे मिळते - वसा, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे इत्यादी जे आपल्याला अन्नातून मिळतात. तसेच, एकाच पदार्थापासून आपल्याला सर्व काही मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला रोजच्या आहारामध्ये विविध प्रकारचे पदार्थ असणे गरजेचे आहे.

त्याच प्रमाणे, निरनिराळ्या उद्दीष्टांसाठी निरनिराळ्या म्युच्युअल फंड स्किम्स आहेत - निरनिराळ्या गुंतवणूकदारांच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी.

आता पाहूया गुंतवणुकींमधुन आपल्याला मुलभूत कोणत्या आवश्यक गोष्टीं मिळायला हव्यात. कुठल्याही गुंतवणूकदाराला मुख्यतः या चार गोष्टींचे एकीकरण पाहिजे असते: (1) भांडवलाची सुरक्षितता, (2) नियमित मिळकत, (3) रोख रक्कम, (4) गुंतवलेल्या भांडवलाची वाढ.

अशा म्युच्युअल फंड स्किम्स उपलब्ध आहेत ज्या या गरजा पूर्ण करतात. अधिक माहितीसाठी डावीकडील तक्ता पाहा.

मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे