मी ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी का?

मी ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

स्टॉक मार्केटमध्ये एक्सपोजर मिळवण्यासाठी ईटीएफ एक कमी खर्चाचे साधन आहे. त्यांत लिक्विडिटी असते आणि लगेच सेटलमेंट होते कारण ते स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असतात आणि स्टॉक प्रमाणेच त्यांचे ट्रेडिंग होते. ईटीएफ कमी जोखमीचे पर्याय आहेत कारण तुमच्या आवडीच्या काही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्या उलट ते एखाद्या स्टॉक इंडेक्सचे अनुसरण करतात आणि त्यांत वैविध्यीकरण(डायवर्सिफिकेशन) असते.

आपल्याला पाहिजे तशी ट्रेडिंगची सोय ईटीएफ मध्ये असते, जसे शॉर्ट सेलिंग करणे किंवा मार्जिनवर खरेदी करणे. कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणे आणि आंतरराष्ट्रीय सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासारखे अनेक पर्यायसुद्धा ईटीएफमध्ये उपलब्ध असतात. आपल्याला आपल्या पोजीशनचे हेजिंग(बचाव-व्यवस्था) करण्यासाठी ऑप्शन आणि फ्यूचर सारखे पर्याय सुद्धा उपलब्ध असतात, जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास उपलब्ध नसतात.

तरीही, ईटीएफ प्रत्येक गुतंवणूकदारासाठी योग्य असेलच असे नाही. दिर्घकालासाठी कमी जोखीम पत्करून इक्विटीमध्ये गुंतवणूकीचा फायदे घेऊ इच्छिणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड अधिक चांगला पर्याय आहेत. ईटीएफ अशा लोकांसाठी सुद्धा उत्तम आहेत ज्यांच्याकडे एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत पण त्यांनी अजून ठरवलेले नाही की गुंतवणूक कुठे करावी. सध्या ते ईटीएफमध्ये गुंतवणूक करून काही परतावा मिळवू शकतात आणि पैसे कुठे गुंतवावे यावर विचार करू शकतात. योग्य ईटीएफ निवडण्यासाठी आर्थिक बाजाराची समज बहुतांश(रीटेल) गुंतवणूकदारांपेक्षा अधिक चांगली असावी लागते. त्यामुळे, आपल्या ईटीएफ गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी यात स्वतः लक्ष घालावे लागते.


 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे