एखाद्या म्युच्युअल फंड स्किम मधील जोखमीचे संकेतक(इंडिकेटर) कसे असतात?

एखाद्या म्युच्युअल फंड स्किम मधील जोखमीचे संकेतक(इंडिकेटर) कसे असतात? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

योग्य म्युच्युअल फंड स्किममध्ये आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवण्याआधी आपल्याला योग्य मूल्यांकन करून घेतले पाहिजे. साधारणपणे गुंतवणूकदार स्किमची श्रेणी (कैटेगरी) पाहातात आणि त्या श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट स्किम निवडतात, तरीही बहुधा ते त्या स्किममधील जोखमीच्या संकेतकांकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा आपण योग्य स्किम निवडण्यासाठी स्किमची तुलना करता, तेव्हा त्यांच्यातील जोखमीकडे दुर्लक्ष करू नका. मानक विचलन (स्टैंडर्ड डीवीएशन), बीटा आणि शार्प रेशो यासारखे जोखमीचे अनेक संकेतक कुठल्याही स्किमच्या फॅक्टशीटमध्ये दिलेले असतात. तरीही सर्वात अगोदर पाहिली जाणारी मूलभूत गोष्ट म्हणजे उत्पाद लेबल. लेबल मधील रिस्कोमीटर त्या फंडामधील जोखमीचा स्तर दाखवते. सेबीने (SEBI) रिस्कोमीटर अनिवार्य केले आहे आणि हे रिस्कोमीटर फंडमधील आंतर्भूत जोखीम दर्शवते. याचे सहा स्तर आहेत - कमी, कमी ते मध्यम, मध्यम, थोडी अधिक, अधिक आणि फार अधिक - आणि या स्तरांना विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड्सशी त्यांच्या पोर्टफोलिओमधील जोखमीच्या स्तराप्रमाणे जोडले गेले आहे. जोखमीचे हे स्तर सेबीने दिलेले असल्यामुळे सर्व म्युच्युअल फंड्ससाठी एका प्रकारच्या म्युच्युअल फंड्सना जोखमीच्या एकाच स्तरावर ठेवणे गरजेचे आहे.

रिस्कोमीटर एका फंडच्या जोखमीच्या स्तराबद्दल माहिती देतो, त्याचप्रमाणे आपण फॅक्टशीटमध्ये दिलेल्या जोखमीच्या विविक्षित संकेतकांकडेही पाहू शकता. मानक विचलन (स्टैंडर्ड डीवीएशन) एखाद्या फंडाच्या परताव्यामधील अंतर दाखवते. ज्या स्किमच्या परताव्याचे मानक विचलन (स्टैंडर्ड डीवीएशन) अधिक असेल, त्या स्किमचा परतावा एक सारखा नसतो, ज्याने कळते की त्यात अधिक चढ-उतार आहेत. 

बीटा एखाद्या फंडच्या चढ-उताराची तुलना मार्केटशी करण्याचे मापक आहे. बीटा >1 असल्यास असे कळते की त्या स्कीममध्ये मार्केटपेक्षा अधिक चढ-उतार असेल आणि बीटा <1 असल्यास त्या स्कीममधील चढ-उतार मार्केटपेक्षा कमी असेल. बीटा 1 असल्यास स्कीम आणि मार्केटचा चढ-उतार सारखाच असेल.

शार्प अनुपात किंवा शार्प रेशो द्वारे हे कळते की त्या फंडमध्ये जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी किती अधिक परतावा मिळतो. जोखीम-समायोजित परताव्यासाठी हा एक चांगला संकेतक आहे.

आता जेव्हा आपल्याला गुंतवणुकीसाठी एखादी स्कीम निवडायची असेल, तर आपण त्या स्कीमचे मूल्यांकन वरील जोखीम संकेतकांप्रमाणे करायचे विसरू नका.

452
475
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे