फंड व्यवस्थापकांची गरज असते का?

फंड व्यवस्थापकांची गरज असते का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

याचे उत्तर जोरात, मोठ्याने द्यायचे झाले तर, ‘होय’ असे आहे! हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पैशाचे व्यवस्थापन/ गुंतवणूक करण्याचा अनुभव असणे चांगल्या कामगिरीसाठी फार महत्त्वाचे असते. जेवढा अनुभव अधिक असतो, गुंतवणुकीबद्दल फायदा करून देणारे निर्णय घेण्याची शक्यता तेवढीच अधिक असते.

फंड व्यवस्थापकाची भूमिका तीच असते जी ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या शल्यविशारदाची असते. शल्यविशारद स्वतः जरी महत्त्वाचे शस्त्रक्रिया करीत असले, तरीही त्यांच्या मदतीसाठी सहाय्यक शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, नर्सेस आणि इतर लोक असतातच. त्याच प्रमाणे फंड व्यवस्थापकांच्या मदतीसाठी त्यांची संशोधन टीम, कनिष्ठ फंड व्यवस्थापक आणि इतर कामांसाठी टीम असते. ज्याप्रमाणे शल्यविशारदाकडे शस्त्रक्रिया सफल करण्यासाठी अद्ययावत उपकरणे असतात, त्याच प्रमाणे फंड व्यवस्थापकाकडे नवनवीन माहिती, अहवाल आणि विश्लेषणे असतात.

अनुभवी फंड व्यवस्थापकाने अनेक आर्थिक चक्रे, व्यवसायतील बदल, राजकारणातील आणि नीतिगत बदल पाहिले असतात. असे मुद्दे गुंतवणुकीच्या कामगिरीवर आपला प्रभाव टाकतात. साधारणपणे असे सर्व मुद्दे सामान्य गुंतवणूकदारांच्या आकलना पलिकडले असल्यामुळे फंड व्यवस्थापक फक्त त्यांचे स्वतःचे कसब आणि कौशल्यच पणाला लावत नाहीत तर त्यांच्याकडे असलेल्या माहिती आणि डेटा ह्यामुळे आलेले सामूहिक चातुर्य सुद्धा पणाला लावतो.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे