डेब्ट फंड्स म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

डेब्ट फंड्स अशी म्युच्युअल फंड स्किम असते जे फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंटध्ये गुंतवणूक करतात, जसे कॉर्पोरेट आणि सरकारचे बाँड्स, कॉर्पोरेट डेब्ट सिक्युरिटीज आणि मनी मार्केट इंस्ट्रूमेंट इत्यादी ज्यामुळे भांडवल वाढण्याची शक्यता असते. डेब्ट फंड्सना फिक्स्ड इन्कम फंड्स किंवा बाँड फंड्स सुद्धा म्हटले जाते.

डेब्ट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याच्या काही मुख्य फायद्यांपैकी आहेत, कमी खर्चाची आकारणी, अपेक्षेनुसार स्थिर परतावा, अपेक्षेनुसार अधिक लिक्विडिटी आणि वाजवी सुरक्षा.

डेब्ट फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य असतात ज्यांना नियमित उत्पन्न मिळवणे ज्यांचे उद्दीष्ट असते तसेच अधिक जोखीम पत्करायची नसते. डेब्ट फंड्समध्ये चढ-उतार कमी असतात, आणि म्हणूनच त्यांत इक्विटी फंड्सपेक्षा कमी जोखीम असते. जर आपण पारंपरिक स्थिर मिळकत उत्पादने जसे बँकेतील ठेवी मध्ये बचत करता आहात, आणि आपल्याला कमी चढ-उतार आणि स्थिर परतावा पाहिजे असेल, तर त्यापेक्षा अधिक चांगला पर्याय डेब्ट फंड्सचा ठरु शकेल, कारण ते आपल्याला आपले वित्तीय उद्दिष्ट  पूर्ण करण्यात मदत करताना, करलाभाच्या दृष्टीने अधिक योग्य असतात आणि त्यामुळे त्यांचा परतावा अधिक चांगला असतो.

परिचालनाच्या दृष्टीने डेब्ट फंड्स इतर म्युच्युअल फंड स्किम्स पेक्षा पूर्णपणे निराळे नसतात. तरीही, भांडवलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते इक्विटी म्युच्युअल फंड्स पेक्षा अधिक सुरक्षित असतात.

460
453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे