योजनेच्या निवडीमध्ये गुंतवणूक सल्लागार किंवा म्युचुअल फंड वितरकाची नेमकी भूमिका काय असते?

योजनेच्या निवडीमध्ये गुंतवणूक सल्लागार किंवा म्युचुअल फंड वितरकाची नेमकी भूमिका काय असते?

म्युच्युअल फंड सही आहे?

साधारणपणे, लोक स्वतःच एखादी स्किम निवडतात, तेव्हा त्यासाठी ते त्या स्किमच्या कामगिरीचा आधार घेतात. मागील कामगिरी टिकून राहीलच असे नाही, ह्याचा विचार ते करत नाहीत. स्किमचे मूल्यमापन करताना त्या स्किमच्या विविध गुणांवर लक्ष द्यावे लागते, जसे स्किमचे उद्दिष्ट, गुंतवणुकीचा आवाका, त्या फंडने पत्करलेली जोखीम, इत्यादी. ह्यासाठी गुंतवणूकदारांनी वेळ देणे आणि मेहनत घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराकडे सर्व वैशिष्ट्ये आणि बारकावे समजून घेण्यासाठी, तसेच उपलब्ध असलेल्या अनेक स्किम्सचे विश्लेषण करून त्यांची तुलना करण्यासाठी तसे कौशल्य असावे लागते. म्युच्युअल फंड्सचे वितरक किंवा गुंतवणूक सल्लागार त्यामध्ये तज्ञ आणि त्यासंबंधित प्रशिक्षण घेतलेले असतात.

दुसरे म्हणजे, सर्वोत्कृष्ट स्किममध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे गुंतवणूकदाराच्या सध्याच्या परिस्थितीला अनुकूल अशा स्किममध्ये गुंतवणूक करणे. तसे तर, गुंतुणूकदाराची परिस्थिती स्वतः गुंतवणूकदारालाच चांगली माहिती असते, तरीही योग्य सल्लागार किंवा वितरक योग्य ते प्रश्न विचारून ती माहिती काढून घेऊ शकतात.

एकदा पोर्टफोलिओ तयार केल्यानंतर, त्या पोर्टफोलिओवर तसेच स्किमच्या वैशिष्ट्यांवर सतत लक्ष ठेवावे लागते, आणि हे काम नेहमीच सुरू असते. सल्लागार/ वितरक आपल्याला या स्किमचा आढावा घेण्यास सुद्धा मदत करतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे