म्युच्युअल फंड वापरून रिटायरमेंटसाठी निधी कसा तयार करावा?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही की रिटायरमेंट नंतरचे त्यांचे आयुष्य साधारणपणे तेवढेच मोठे असू शकेल जेवढे त्यांचे काम करण्याचे आयुष्य होते आणि त्यांना 25-30 वर्षे कामास येईल एवढा मोठा निधी त्या काळासाठी लागेल. योग्य आर्थिक नियोजनाशिवाय, सर्व खर्च आणि आपत्कालीन गरजा भागवण्यासाठी आपली बचत पुरेशी असेलच असे नाही. पण आपल्याला रिटायरमेंटच्या नंतर 25-30 वर्षे पुरेल एवढा निधी आपण कसा तयार करू शकता? पहिली गोष्ट, रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला खर्चासाठी वर्षाकाठी किती पैसे लागतील याचा अंदाज घेण्यासाठी आमच्या चलनवाढ कॅल्क्युलेटर ची मदत घ्या आणि आपल्या रिटायरमेंटनंतर 25-30 वर्षे पुरण्यासाठी आपल्याला एकूण किती निधीची गरेज असेल याचा निर्णय घ्या. एकदा रिटायरमेंट निधीच्या आकड्याचा अंदाज आला, की त्यानंतर आपण आमचा उद्दिष्ट SIP कॅल्क्युलेटर वापरून आपली मासिक SIP रक्कम ठरवा ज्या रकमेने आपण आत्ता सुरू करून आपल्या रिटायरमेंट निधीपर्यंत पोहचू शकता. SIP च्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा असा की याने आपल्या खिशावर फारसा भार पडत नाही आणि आपल्या मासिक मिळकतीतून आपण हे सहजपणे करू शकता.

त्यानंतर, जोखीम पत्करण्याच्या आपल्या क्षमतेप्रमाणे काही म्युच्युअल फंड स्कीम निवडा ज्यात दीर्घ कालावधीसाठी वाढ मिळू शकेल. दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंड घ्यायचा सल्ला दिला जातो, पण आपण डेब्ट किंवा हायब्रिड फंडसुद्धा निवडू शकता. आपण निवडलेल्या म्युच्युअल फंड स्कीमचा प्रकार आणि श्रेणी याप्रमाणे परताव्याबद्दल आपल्या अपेक्षा संरेखित (अलाइन) करा.

सुरुवात चांगली केल्याने अर्धे काम होते. सर्वात उत्तम पद्धतीने सुरुवातीपासूनच शिस्तीने वागल्याने रिटायरमेंटच्या काळात सुखी आयुष्य जगण्याचे आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कमी प्रयत्न लागतील.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे