म्युच्युअल फंड्सच्या सहाय्याने मी कोणकोणत्या प्रकारची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकेन?

म्युच्युअल फंड्सच्या सहाय्याने मी कोणकोणत्या प्रकारची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकेन? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्सचे एक उत्तम वैशिष्ट आहे की आपले आर्थिक उद्दिष्ट कोणतेही असो, आपल्याला त्यासाठी योग्य स्किम नक्कीच मिळू शकते.

म्हणजे जर आपली आर्थिक उद्दिष्ट ही दीर्घकालीन असतील जसे की आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन किंवा आपल्या मुलांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च, तर इक्विटी फंड्स मधील गुंतवणूक हा आपल्यासाठी योग्य पर्याय ठरू शकेल.

जर आपले उद्दीष्ट हे नियमित उत्प्पन मिळवण्याचे असेल तर त्यासाठी फिक्स्ड इन्कम फंडाचा विचार केला जाऊ शकतो.

आपल्याला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला आणि ते पैसे आपण कुठे गुंतवू इच्छिता ह्याचा निर्णय अजून व्हायचा असेल, तर आपण लिक्विड फंडचा विचार करु शकता. आपण लिक्विड फंडचा बचत खात्यासाठी किंवा तुमचे खेळते भांडवल चालू खात्यात ठेवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून विचार करता येऊ शकेल.

म्युच्युअल फंड्स हे कर वाचवण्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवत असतात. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) हे विशेषतः त्याचसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

व्यावहारिकदृष्ट्या आपल्या गुंतवणूकीच्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड्स हे एकमेव ठिकाण आहे.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे