जर आपला एसआयपी हप्ता दिला गेला नाही तर काय होते?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

ब-याच गुंतवणूकदारांना काळजी असते की जर ते दिलेल्या मुदतीमध्ये एसआयपी रक्कम देऊ शकले नाहीत तर त्यांचे म्युच्युअल फंड्स मध्ये नुकसान होईल. जर आपण कोणत्या आर्थिक संकटातून जात असाल किंवा नोकरीची किंवा व्यवसायातील उत्पन्नाची शाश्वती नसेल तर अशा काही कारणांमुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली नियमित एसआयपी रक्कम भरू शकणार नाही हे अगदी स्वाभाविक आहे. एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय असल्याने जर मध्येच कधी रक्कम भरणे शक्य नाही झाले तरी काही हरकत नाही. विमा पॉलिसीमध्ये जर आपण वार्षिक प्रिमियम भरु शकला नाहीत तर आपली पॉलिसी बाद होते तसे इथे होत नाही, इथे आपली आजपर्यंत जेवढी गुंतवणूक झाली असेल, त्यावर आपल्याला परतावा मिळत राहतो आणि आपण ते पैसे कधीही काढून घेऊ शकतो. पण, जर आपण एसआयपी रक्कम भरण्यात जास्त अनियमित असाल तर आपल्या सुरुवातीच्या अपेक्षांपेक्षा कमी संपत्ती संचय होऊन आपली आर्थिक उद्दिष्टे कदाचित साध्य होणार नाहीत.

जरी म्युच्युअल फंड कंपनी आपल्याला एसआयपी हप्ता न भरल्या बद्दल दंड आकारत नसली, तरी आपले एसआयपी देय सलग तीन महिने हुकले तर आपले एसआयपी आपोआप रद्दबातल ठरवले जाते. तसेच आपली बँक आपल्याकडून ऑटो डेबिट पेंमेटचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारु शकते. त्यामुळे, जर आपल्याला भविष्यात काही आर्थिक संकटामुळे रक्कम भरणे शक्य नसेल, तर एसआयपी बंद करण्याची सूचना कमीत कमी 30 दिवस कळवणे योग्य असते. नंतर जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल तेव्हा नवीन एसआयपी सुरु करा.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे