रिटायरमेंट प्लानिंग तुम्ही लवकर का सुरू करावी याची 7 कारणे

रिटायरमेंट प्लानिंग तुम्ही लवकर का सुरू करावी याची 7 कारणे zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

रिटायरमेंट प्लानिंग लवकर सुरू करणे म्हणजे घर बांधण्यासारखे आहे. घरासाठी भक्कम पाया घालणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आर्थिक पाया मजबूत असणेही महत्त्वाचे आहे.

घर बांधण्याची पहिली पायरी म्हणजे आराखडा तयार करणे आणि आवश्यक साहित्य निश्चित करणे. रिटायरमेंट प्लानिंगच्या बाबतीतही हेच आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षित रिटायरमेंटच्या वयात आवश्यक रिटायरमेंट निधी पर्यंत पोचणारी गुंतवणूक साधने ओळखावी लागतील.

बांधकाम प्रगतीपथावर असताना, वेळोवेळी प्रगतीचे मूल्यमापन करणे, आवश्यक नियोजन करणे आणि संरचनेचा हेतू पूर्ण होत असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे. त्याच प्रकारे, तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन (तपासणी) केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास तुमच्या योजनेमध्ये सुधारणा केली पाहिजे.

शेवटी, एकदा घर पूर्ण झाल्यावर, तुमच्याकडे राहण्यासाठी आरामदायक आणि सुरक्षित जागा असेल. त्याचप्रमाणे, बचत आणि गुंतवणुकीसाठी लवकर आणि शिस्तबद्ध दृष्टीकोन अंगीकारला तर तुमच्या आरामदायक आणि सुरक्षित निवृत्तीस हातभार लागू शकतो.

तुम्ही आत्ताच रिटायरमेंट प्लानिंग का सुरू करावी याची सात कारणे पुढील प्रमाणे आहेत.

1. राहणीमानाचा खर्च वाढतच चालला आहे
भारतात राहणीमानाचा खर्च सातत्याने वाढत आहे आणि यापुढेही वाढत राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की रिटायरमेंटनंतर ही तुमची जीवनशैली सुरू ठेवण्यासाठी, तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत याची खात्री करण्यासाठी, शक्य तितक्या लवकर रिटायरमेंटसाठी बचत सुरू करणे महत्वाचे आहे.

2. महागाई तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकते
काळानुसार वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या वेगाने वाढतात त्याला महागाई म्हणतात. महागाई ही एक महत्त्वपूर्ण चिंता असू शकते आणि जर तुम्ही त्याचे प्लानिंग केले नाही तर कालांतराने तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकतो.

3. तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा समायोजित करण्यासाठी अधिक वेळ
तुमचे रिटायरमेंट प्लानिंग लवकर सुरू केल्याने तुम्हाला तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ समायोजित करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. यामुळे तुम्हाला तुमची जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि कालांतराने तुमचा परतावा वाढवण्यास मदत करू शकते. शंका असल्यास, मार्गदर्शन आणि स्पष्टीकरणासाठी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे उचित आहे.

4. चक्रवाढीची शक्ती
तुमच्या गुंतवणुकीची कमाई चक्रवाढ प्रक्रियेद्वारे पुन्हा गुंतवली जाते, यामुळे कालांतराने तुमच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळतो. तुम्ही रिटायरमेंट प्लानिंग लवकर सुरू केल्याने तुम्हाला चक्रवाढ शक्तीचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल, परिणामी तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. एक उदाहरण पाहू:

तपशील

25 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करा

30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करा

35 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करा

रिटायरमेंटची वेळ (तुम्ही 60 व्या वर्षी रिटायर झाले असे गृहीत धरून) (अ)

35

30

25

दरमहा गुंतवलेली रक्कम (ब)

Rs 10,000

Rs 10,000

Rs 10,000

गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा*

10%

10%

10%

गुंतवलेली रक्कम

42 लाख रुपये

36 लाख रुपये

30 लाख रुपये

परताव्यासह जमा झालेला एकूण निधी

3.8 कोटी रुपये

2.26 कोटी रुपये

1.34 कोटी रुपये

विलंबाने केलेल्या गुंतवणुकीची किंमत

-

1.2 कोटी रुपये

2.5 कोटी रुपये

वरील गणित केवळ उदाहरणाच्या उद्देशाने आहेत. गुंतवलेल्या रकमेची गणना सूत्राचा वापर करून केली आहे: ए * बी * 12. एसआयपी कॅल्क्युलेटरचा वापर करून परताव्यासह जमा झालेल्या एकूण निधीची गणना केली गेली. वयाच्या 25 व्या वर्षापासून तयार झालेल्या एकूण कॉर्पसमधून विशिष्ट वयात जमा झालेला एकूण निधी वजा करून गुंतवणुकीला उशीर करण्याची किंमत निश्चित केली जात असे.

5. परतावा मिळविण्याची संधी
लवकर गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात परतावा मिळवण्याच्या क्षमतेसह गुंतवणुकीच्या संधी शोधण्याची शक्यता वाढते. वेगवेगळ्या पर्यायांचे संशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी स्वत:ला अधिक वेळ देऊन, तुम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या बचत वाढीला गती देऊ शकता आणि रिटायरमेंट नंतरच्या तुमच्या आर्थिक गरजांसाठी अधिक चांगली तयारी करू शकता.

6. लवकर नियोजन केल्यास तणाव कमी होऊ शकतो
तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितके भविष्याचे नियोजन आणि बचत करणे सोपे जाईल, त्यामुळे तणाव कमी होईल.

7. तुमच्या स्वत:च्या अटींवर निवृत्त व्हा
तुमचे रिटायरमेंट प्लानिंग लवकर सुरू केल्याने तुम्ही केव्हा आणि कसे रिटायर व्हाल यावर अधिक नियंत्रण मिळू शकते. शिवाय, तरुण वयात, तुमच्याकडे कमी जबाबदाऱ्या आणि उद्दिष्ट असू शकतात ज्यामुळे रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करणे अधिक व्यवहार्य बनते. हे तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा जास्त काळ काम करण्यास भाग पाडण्याऐवजी तुम्हाला हवे तेव्हा आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर निवृत्त होण्याची लवचिकता देऊ शकते.


अंतिम शब्द
तुम्ही तुमच्या सुवर्ण वर्षात प्रवेश करता तेव्हा तुमची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या रिटायरमेंट प्लानिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही लवकरात लवकर रिटायरमेंट प्लानिंग सुरू करावी. काही म्युच्युअल फंड योजना निवृत्ती नियोजनासाठी विशेषतः डिझाइन केलेल्या सोल्युशन-ओरिएंटेड रिटायरमेंट प्लॅन्सच्या श्रेणीत येतात. तथापि, तुमच्याकडे इतर प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि त्यांना निवृत्तीसाठी राखून ठेवण्याचा पर्याय देखील आहे. तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास, तुमच्या म्युच्युअल फंड वितरकाकडून मार्गदर्शन घेणे योग्य आहे.

तथापि, रिटायरमेंट प्लानिंग करण्यास विलंब करणे म्हणजे जास्त गुंतवणूक प्रीमियम देण्याचा धोका घेणे. रिटायरमेंट नंतरच्या तणावमुक्त आणि आरामदायक लाईफची सुरुवात करण्याअगोदर स्वत: ला सर्वोत्तम संधी देण्यासाठी लवकर प्रारंभ करा.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे