एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक करणे कोणत्या वयात सुरू करावे?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जर आपल्याला असे वाटत असेल की आत्ता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फार घाईचे आहे किंवा त्यासाठी फार उशीर झालेला आहे, तर खात्री ठेवा की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे योग्य वय आजचेच आहे, जेव्हा आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तेच. पण आपण गुंतवणुकीची सुरुवात जेवढी लवकर करता, तेवढेच आपल्यासाठी चांगले असते कारण दीर्घकाळामध्ये चक्रवाढीच्या शक्तीने म्युच्युअल फंड आपल्याला मालमत्ता निर्मिती करण्यासाठी मदत करतात. 

आपल्या गुंतवणुकींवर चक्रवाढीच्या शक्तीला आपली जादू दाखवण्यासाठी आपल्याला आपल्या करीअरच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करायला पाहिजे. खरे तर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ म्हणजे आपण कमवायला सुरुवात केली तोच दिवस. जर पण आपल्या मासिक कमाईमधून थोडी बचत करून एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (सिप) द्वारे गुंतवणूक सुरू केलीत, तर आपल्या पैशाला वाढायला चांगला सुदीर्घ कालावधी मिळतो. भविष्यात जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्याला अशा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा मिळेल. लक्षात ठेवा, अशा म्युच्युअल फंड स्किममध्ये गुंतवणूक करा ज्यांच्या जोखमीचे स्तर आपल्या जोखीम पत्करण्याच्या स्तराप्रमाणे असेल, म्हणजेच तशी जोखीम पत्करण्याची आपली इच्छा आणि क्षमता दोन्ही असली पाहिजे.

आपण जसजसे वयाने मोठे होतो, आपल्या आयुष्याची ध्येये आपल्या कमाईप्रमाणे मोठी होत जातात. आपल्या पहिल्या पगारापासूनच एसआयपीच्या माध्यमाने आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासाची सुरुवात करा आणि प्रत्येक वेळी पगारवाढ झाल्यावर त्यातसुद्धा भर घालत चला ज्याने आपण आपले ध्येय सहज पूर्ण करू शकाल. पण जरी आपण अजून सुरुवात केलेली नसेल, तरीही आपला म्यु्च्युअल फंडचा प्रवास सुरू करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो कारण चक्रवाढीच्या शक्तीमुळे आपण आज सुरू करून सुद्धा, काही वर्षांनंतर सुरू केल्याच्या तुलनेत अधिक परतावा मिळवू शकता.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे