"म्युच्युअल फंड्स सही आहे" ही AMFI ची एक इन्व्हेस्टर एज्युकेशन मोहिम आहे, जी लोकांमध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी आणि त्यांना म्युच्युअल फंड्सचे फायदे सांगण्यासाठी राबवली जाते. आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यावे की SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये नियमितपणे थोडी-थोडी गुंतवणूक करून कालांतराने संपत्ती तयार करता येते.
MFSH मोहिमेने, साध्या पण स्पष्ट संदेशांद्वारे – बहुभाषिक जाहिराती, डिजिटल व्हिडिओ आणि वेबसाइटच्या माध्यमातून – म्युच्युअल फंड्स विषयी असलेले गैरसमज दूर करण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेमुळे म्युच्युअल फंड्स सामान्य गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय झाले असून, गुंतवणूकदार खाती आणि गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यात या इंडस्ट्रीला मोठी मदत झाली आहे.
म्युच्युअल फंड्स सही आहे याबद्दल
'म्युच्युअल फंड्स सही आहे' ही इन्व्हेस्टर एज्युकेशन मोहिम असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या मार्गदर्शनाखाली मार्च 2017 मध्ये सुरू केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे म्युच्युअल फंड्सची संकल्पना सामान्य लोकांसाठी समजायला सोपी बनवणे. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही टीव्ही, डिजिटल, रेडिओ, प्रिंट, आउटडोअर आणि सिनेमा अशा विविध माध्यमांचा वापर करतो – तोही अनेक भाषांमध्ये.
म्युच्युअल फंड्स असोसिएशन ऑफ इंडिया (AMFI) याबद्दल
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचा व्यावसायिक, स्वस्थ आणि नैतिक तत्वांवर विकास साधण्याच्या दृष्टीने ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) कार्यरत आहे. म्युच्युअल फंड्स आणि त्यांच्या युनिट धारकांचे हित जपण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे मानदंड प्रस्थापित करण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी AMFI प्रयत्नशील आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ही भारतातील सर्व म्युच्युअल फंड्सच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची (AMCs) एक गैर व्यावसायिक संस्था आहे, जी भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडे नोंदणीकृत आहे. AMFI ची स्थापना 22 ऑगस्ट 1995 रोजी एक गैर व्यावसायिक संस्था म्हणून करण्यात आली होती.
‘म्युच्युअल फंड्स सही आहे’ ही मोहीम AMFI ने 2017 मध्ये SEBIच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. ही मोहीम देशभरातील नागरिकांना त्यांच्या भाषेत म्युच्युअल फंड्सबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून लोक म्युच्युअल फंड्सला एक स्वतंत्र गुंतवणूक पर्याय मानून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकतील.
AMFI आणि त्याच्या इन्व्हेस्टर अवेअरनेस कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती येथे मिळवा: www.amfiindia.com
आमचे ध्येय
आमचे ध्येय आहे म्युच्युअल फंड्सचे जग सामान्यांसाठी सोपे करून देणे, जेणेकरून प्रत्येकजण विचारपूर्वक निर्णय घेऊन आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या दिशेने छोटी छोटी पावले टाकू शकेल.


