सुलभता (ॲक्सेसिबिलिटी) संबंधित माहिती
AMFI सर्व वापरकर्त्यांसाठी, विशेषतः दिव्यांगांसाठी, वेबसाइट सहज आणि सुलभ बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आमचा उद्देश प्रत्येकाला सोपा, सुलभ आणि दर्जेदार अनुभव देणे हाच आहे. त्यामुळे आम्ही वेबसाइट तयार करताना सुलभतेसाठी आवश्यक अशा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असतो.
सुलभ वापरासाठी आम्ही काय करतो:
आमच्या वेबसाइटची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही खालील उपाययोजना करतो:
- नियमितपणे वेबसाइट चेक करून सुलभतेची खात्री करतो
- डिझाइन आणि डेव्हलपमेंट करताना WCAG 2.1 लेव्हल AA गाइडलाइन्सचे पालन करतो
- HTML, ARIA अॅट्रिब्युट्स आणि योग्य (समर्पक) टॅग्स वापरतो
- आमच्या टीमला सुलभता कशी टिकवायची याचं सतत ट्रेनिंग दिले जाते
अनुरूपतेची स्थिती
गाईडलाइनमध्ये तीन लेव्हल असतात: लेव्हल A, लेव्हल AA आणि लेव्हल AAA. आमच्या वेबसाइटसाठी आम्ही लेव्हल AA ही लक्ष्य पातळी म्हणून निवडली आहे.
ही वेबसाइट वेब कंटेंट अॅक्सेसिबिलिटी गाईडलाइन्स (WCAG) 2.1 च्या लेव्हल AA नुसार तयार करण्यात आली आहे. या गाईडलाइन्समुळे दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक, बोलण्याशी संबंधित, संज्ञानात्मक, भाषिक, शिकण्याशी संबंधित आणि न्यूरोलॉजिकल अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी कंटेंट अधिक सुलभ होतो.
अभिप्राय (फीडबॅक)
आमच्या वेबसाइटची सुलभता कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. वापरताना काही अडचण जाणवली किंवा काही सुधारणा सुचवायच्या असतील, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आम्हाला संपर्क करा.
अनुकूलता
ही वेबसाइट पुढील गोष्टींसोबत सुसंगत (कम्पॅटिबल) राहील अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे:
- Chrome, Firefox, Safari आणि Edge यांसारखे आधुनिक ब्राऊझर
- स्क्रीन रीडर, फक्त कीबोर्ड वापरणे, स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर अशा सहाय्यक तंत्रज्ञानासोबत आमची वेबसाइट सुसंगत आहे
मर्यादा
आम्ही सुलभतेचे सर्व नियम पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण काही भाग अजूनही पूर्णपणे सुसंगत नसेलही. ही अडचण दूर करण्यासाठी आणि वेबसाइट आणखी सुलभ बनवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.