गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड्सचे फायदे

गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड्सचे फायदे zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

गोल्ड ईटीएफ 99.5% शुद्ध सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करतात, म्हणजेच यात गुंतवणूक करणे खऱ्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासारखेच आहे. जर आपल्याला दीर्घकाळासाठी सोने साठवायचे असेल, तर खरे सोने विकत घेण्यापेक्षा किंवा गोल्ड फंड मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणे अधिक चांगले आहे.  

गोल्ड म्युच्युअल फंड्स अशा कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात ज्या खाणीतून सोने खणणे, त्यावर प्रक्रिया करणे, घडवणे आणि वितरण करणे अशी कामे करतात. अशा कंपनीच्या स्टॉकच्या किमतीप्रमाणे गोल्ड फंडची कामगिरी बदलत असते. गोल्ड ईटीएफ चा परतावा थेट सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असतो, तर गोल्ड फंडचा परतावा गोल्ड उद्योगाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. 

फंड व्यवस्थापकांद्वारे सक्रिय व्यवस्थापनामुळे गोल्ड म्युच्युअल फंडपासून आपल्याला बाजाराच्या इंडेक्सचे अनुकरण करणाऱ्या गोल्ड ईटीएफपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. ईटीएफ एखाद्या इंडेक्सचे अनुकरण करीत असल्यामुळे, गोल्ड ईटीएफचा खर्चाचा अनुपात गोल्ड फंडपेक्षा कमी असतो. गोल्ड म्युच्युअल फंडपेक्षा गोल्ड ईटीएफ सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार अधिक बारकाईने दर्शवतात. ईटीएफ एक्सचेंजवर लिस्टेड असल्यामुळे त्यांची लिक्विडिटी अधिक चांगली असते. आपण ईटीएफ च्या माध्यतून सोन्याच्याच किंमतीत आपल्या गुंतवणुकीची खरेदी किंवा विक्री करू शकता. त्यामुळे गोल्ड ईटीएफ विकत घेणे हा खरे सोने विकत घेण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमाने गोल्ड उद्योगामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड फंड चांगली संधी देतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे