म्युच्युअल फंड्स बँकांकडून दिले जातात का?

म्युच्युअल फंड्स बँकांकडून दिले जातात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

बँकांचा व्यवसाय बचत आणि कर्ज देणे असतो, तर म्युच्युअल फंड्स हे गुंतवणुकीसाठी असतात. जेव्हा आपण आपले पैसे बचत खात्यामध्ये किंवा मुदत ठेवी मध्ये ठेवतो, तेव्हा आपण बचत करीत असतो, याउलट जेव्हा आपण आपला पैसा म्युच्युअल फंडमध्ये ठेवतो, तेव्हा आपण गुतंवणूक करीत असतो. बँक आणि म्युच्युअल फंड हे दोन फार निराळे व्यवसाय आहेत, ज्यांत निरनिराळ्या विषयगत आणि संस्थात्मक कौशल्यांची गरज असते. बँकाचे नियमन आरबीआय कडून होते, तर म्युच्युअल फंडचे नियमन सेबी (एसईबीआय) कडून होते. जर एकाच संस्थेला बँक आणि म्युच्युअल फंड दोन्ही व्यवसाय करायचे असतील, तर तिला या दोन्ही नियामक संस्थांकडून वेगळा परवाना घ्यावा लागतो आणि हे दोन व्यवसाय वेगवेगळ्या कंपनीच्या स्वरूपात चालवावे लागतात.

आपण काही अशा बँक पाहिल्या असतील ज्यांचा म्युच्युअल फंडचा व्यवसाय सुद्धा आहे. तरीही त्या दोन्ही निरनिराळ्या कंपन्या आहेत ज्यांत आपसात काहीही संबंध नसतो आणि त्या बँकेची कामगिरी उत्तम असली तरीही त्यामुळे परताव्याची कोणतीही हमी नसते.

बहुतांश बँका आज म्युच्युअल फंड्स सारख्या अनेक वित्तीय उत्पादनांचे वितरक म्हणून काम करतात. ते अशा म्युच्युअल फंड्ससाठी विक्रीचे माध्यम म्हणून काम करतात ज्यांच्या सोबत त्यांनी (बँकांनी) वितरणासाठी करार केलेला आहे. त्यामुळे, जर आपण विचार करीत आहात की म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक कशी करावी आणि आपण एखाद्या बँकेमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात घ्या की त्या बँकेमध्ये बाजारात उपलब्ध असलेले सर्व फंड्स विक्री साठी उपलब्ध असतीलच असे नाही.

452
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे