निरनिराळ्या उद्दीष्टांसाठी निरनिराळ्या प्रकारचे फंड आहेत का?

निरनिराळ्या उद्दीष्टांसाठी निरनिराळ्या प्रकारचे फंड आहेत का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

आज बाजारात एवढ्या म्युच्युअल फंड्सच्या स्किम्स आहेत, की कुठली स्किम सर्वोत्कृष्ट आहे असा प्रश्न अगदी सहज पडू शकतो. तरीही, "सर्वोत्कृष्ट” शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.

अनेकदा लोक नजिकच्या काळातील काही "सर्वोत्कृष्ट” स्किम्स निवडतात - अशा स्किम ज्यांनी नजिकच्या काळात सर्वात अधिक परतावा दिलेला आहे.

जर आपण असा एखादा सिनेमा पाहिलात ज्याचे चित्रीकरण अमेरिकेत डिसेंबर महिन्यामध्ये झाले होते, तर आपल्याला दिसेल की त्यातील लोकांनी गरम कपडे घातलेले आहेत. त्यामुळे एखाद्याला तसे कपडे आवडू शकतात आणि त्याला तसे कपडे घालण्याची इच्छाही होऊ शकते. पण कल्पना करा, की तसे कपडे घालून आपण मुंबई किंवा चेन्नईच्या रस्त्यांवर फिरत आहोत?

 म्युच्युअल फंड्सच्या बाबतीत सुद्धा तेच तत्त्व लागू पडते. "सर्वोत्कृष्ट” म्युच्युअल फंड नावाची कोणतीही गोष्ट नसते. - एखाद्या परिस्थितीमध्ये योग्य काय आहे आणि ते आपल्या गुंतवणूक उद्दीष्ट्यांसाठी योग्य आहे का ह्यावर सगळे अवलंबून असते.

दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी वेगळे आणि अल्पकालीन गरजांसाठी वेगळे फंड्स आहेत. काही अग्रेसिव्ह फंड असतात जे काहीशा मॉडरेट फंड्सपासून आणि अगदी पारंपारिक(कंजर्वेटिव) फंड्सपासून खूप वेगळे असतात. मालमत्ता संचय किंवा रोख रक्कम परावर्तनासाठी असलेल्या फंड्सपेक्षा नियमित उत्पन्नासाठी असलेले फंड्स वेगळे आहेत. 

म्हणूनच सर्वोत्कृष्ट फंडच्या शोधात राहू नका - आपल्यासाठी योग्य काय आहे त्याचा शोध घ्या.

459
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे