त्रैमासिक (क्वार्टरली) रक्कम देतील असेही फंड आहेत ?

त्रैमासिक (क्वार्टरली) रक्कम देतील असेही फंड आहेत ?

म्युच्युअल फंड सही आहे?

जर आपल्याला आपला महिन्याचा घरगुती खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्न हवे असेल, तर आपल्याला म्युच्युअल फंड्समधून सिस्टीमॅटिक विथड्रॉल प्लॅन्स (एसडब्ल्यूपी) सुरू केले पाहिजे. यासाठी आपल्याला एका योग्य स्किममध्ये एकरकमी मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर एक वर्षाने एसडब्ल्यूपी सुरू करावी, जेणेकरून शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. आपण आपल्या गरजेप्रमाणे यातून काढायची रक्कम आणि आवृत्ती निश्चित करू शकता आणि पाहिजे तेव्हा त्यात बदलू शकता.

म्युच्युअल फंड स्किम्स मधून पैसे काढण्यासाठी एसडब्ल्यूपी करणे लाभांशापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे कारण लाभांशाची कोणतीही हमी दिली जात नाही. आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडने ज्या कंपनींमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी मिळवलेल्या नफ्यावर लाभांश अवलंबून असतात. जर बाजार पडला आणि आपल्या फंडच्या पोर्टफोलिओचे नुकसान होत असले, तर आपल्याला लाभांश मिळणार नाहीत. एसडब्ल्यूपी केल्याने, स्किम जरी फायदा देत नसली, तरीही आपल्या मुद्दलातून आपल्याला पैसे मिळणे सुरू राहील. म्हणूनच, एसडब्ल्यूपी करण्यासाठी आपल्याला एकरकमी गुंतवणूक आधी करून घ्यावी लागेल. काढायची रक्कम आपण आपल्या एकरकमी गुंतवणुकीच्या काही टक्के (%) निश्चित करू शकता जी आपल्या फंडच्या अपेक्षित परताव्यापेक्षा थोडी कमी असेल, जेणेकरून बहुतांश वेळी आपले भांडवल सुरक्षित राहील.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे