सुरक्षित गुंतवणूक आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुरेशा नाहीत का?

सुरक्षित गुंतवणूक आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुरेशा नाहीत का? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवे, की नियमित खर्च आणि त्याचबरोबर अनेक आर्थिक उद्दिष्टांसाठी मोजावी लागणारी किंमत काळानुसार वाढत असते. जर महागाईचा दर प्रतिवर्ष 6% असेल, तर एका आर्थिक उद्दिष्टाची किंमत 12 वर्षांत दुप्पट होते. परंतु, जर महागाई 7% वर असेल, तर हे 10 वर्षांतच होऊ शकते.

आता महागाई 7% वर आहे आणि आपण आपल्या मुद्दलाची रक्कम पूर्णपणे सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर आपण महागाईच्या जवळपास परतावे देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकाल. गुंतवणुकीवरील परताव्यांवरील करांच्या तरतुदी करत असाल, तर आपले कर वजावटीनंतरचे परतावे हे महागाईच्या दरापेक्षा कमी असतात.

आता काही सोपे आकडे घेऊयात:

जर महागाईचा दर प्रतिवर्ष 7% आहे, आणि आपण आत्ता एखादी वस्तू 100 रुपयांना घेऊ शकत असाल, तर आपल्याला पुढच्या वर्षी तीच वस्तू घ्यायला 107 रुपये लागतील. एक वर्षानंतर, जर महागाई तेवढीच राहिली, तर त्या वस्तूची किंमत 114.49 रुपये होईल.

त्याच वेळी जर आपण आपले पैसे कर वजावटीनंतर प्रतिवर्ष 6% दराने परतावा देत असलेल्या पूर्णपणे सुरक्षित अशा पर्यायामध्ये गुंतवले असतील, तर 100 रुपयांचे 106 रुपये होतील. ही रक्कम वर आवश्यक असलेल्या रकमेपेक्षा 1 रुपयाने कमी असेल. दोन वर्षानंतर, ही रक्कम वाढून 112.36 रुपये झाली असेल, जी रक्कम वस्तूच्या किमतीपेक्षा कमी असेल. डाव्या बाजूला असलेला तक्ता गुंतवणुकीचे अंदाजे मूल्य, उद्दिष्टांची किंमत आणि काही वर्षांच्या काळात त्यांच्यामध्ये निर्माण होणारी दरी ठळकपणे दाखवितो.

म्हणूनच फक्त बचत नाही तर गुंतवणूक करणेही गरजेचे आहे.

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे