तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपीची योग्य रक्कम निवडा

तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपीची योग्य रक्कम निवडा zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) ही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची शिस्तबद्ध पद्धत आहे. या योजनेत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये ठराविक अंतराने (दररोज, साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक) ठराविक रक्कम गुंतवू शकतो. एसआयपीमध्ये, गुंतवणूकदार रक्कम ठरवू शकतो आणि ॲसेट व्यवस्थापन कंपन्यांनी ऑफर केलेली एसआयपी तारीख निवडू शकतो. 

तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की एसआयपी हे गुंतवणुकीचे उत्पादन नसून म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीची एक पद्धत आहे, जिथे किमान एसआयपीची रक्कम 500 रुपयांपासून सुरू होते. तर म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची दुसरी पद्धत एकरकमी आहे, ज्यात तुम्ही फक्त एकदाच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता. 

तसे पाहिले तर, पहिली पायरी म्हणजे एसआयपी म्हणून गुंतवणूक करण्याची रक्कम निश्चित करणे. एखाद्या व्यक्तीने स्वतःची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. तुमच्या उद्दिष्टांचे तीन व्यापक श्रेणींमध्ये वर्गीकरण करा: तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केल्यापासून दीर्घ मुदतीची, मध्यम मुदतीची आणि अल्प मुदतीची. 

दीर्घ मुदतीची उद्दिष्टे अशी असतात जी सामान्यतः 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी असतात. तुम्ही 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत साध्य करू इच्छित असलेली उद्दिष्टे मध्यम मुदतीची उद्दिष्टे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात. तर अल्प मुदतीची म्हणजे अशी उद्दिष्टे जी तुम्हाला 6 महिने ते 3 वर्षांच्या कालावधीत साध्य करायची असतात. एकदा तुम्ही तुमचे उद्दिष्ट ठरवल्यानंतर, तुम्ही उद्दिष्टाच्या आधारे योजना सुनिश्चित करू शकता. 

उदाहरणार्थ, जर तुम्ही 15 वर्षांनंतर खर्च होणार असलेला कॉर्पस निधी (शिक्षण, अपत्याचे लग्न, घर खरेदी करणे आणि बरेच काही) तयार करण्याचे दीर्घ मुदतीची उद्दिष्ट ठेवले असेल तर या उद्दिष्टाची सध्याची किंमत जाणून घ्या. 

तर, आता तुम्हाला या उद्दिष्टाची सध्याची किंमत आणि ते गाठण्यासाठी शिल्लक असलेली वर्षे समजली आहेत. महागाईचा दर विचारात घ्या आणि तुमच्या उद्दिष्टाची किंमत वाढली आहे. 

आता, महागाईच्या दरासह चालू रकमेची गणना केल्यावर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक अंतिम रक्कम मिळेल. तुमच्या एसआयपी गुंतवणुकीसाठी नेमकी रक्कम जाणून घेण्यासाठी तुम्ही या अंतिम रकमेचा वापर करू शकता. 

 

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

290
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे