विलंबित गुंतवणुकीची किंमत

विलंबित गुंतवणुकीची किंमत zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

असे समजा की हिवाळ्याच्या दिवसात तुमचा एअर कंडिशनर (एसी) खराब झाला आहे. तुम्ही वाटते की तुम्हाला आत्ता त्याची आवश्यकता नाही व तुम्ही त्याला दुरुस्त करणे लांबणीवर टाकता. पण जेव्हा उन्हाळा येतो आणि उष्णता सहन होत नाही तेव्हा तुम्हाला एसी दुरुस्त करावाच लागतो. दुर्दैवाने, हीच सर्वात जास्त मागणीची वेळ असते आणि दुरुस्ती करणारा टेक्निशियन शोधणे कठीण होते. शेवटी एखादा टेक्निशियन जेव्हा येतो, तेव्हा तो तुम्हाला सांगतो की दुरुस्तीसाठी अजून एक आठवडा लागेल आणि मागणी जास्त असल्यामुळे आवश्यक असणारा मदरबोर्ड मिळविण्यासाठी जास्त किंमत पडेल, त्यामुळे तो अधिक महाग पडेल.

नंतरच्या काही महिन्यांपर्यंत तुमच्या एसीच्या दुरुस्तीला उशीर होतो आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तोपर्यंत ते एक महाग प्रकरण बनलेले असते. 

गुंतवणुकीतीला उशीर होण्याची किंमत अशाच प्रकारे कार्य करते. तुम्ही गुंतवणुकीला उशीर केल्यामुळे, त्याच्या परिणामी तुम्ही तुमच्या पैशातून उत्पन्न मिळविण्याच्या क्षमतेला उशीर होतो. त्यामुळे व्यवसाय सुरू करणे किंवा सेवानिवृत्तीसाठी बचत करणे यासारख्या गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे संधी गमावल्या जाऊ शकतात आणि होऊ शकणारा नफा गमावला जाऊ शकतो.

गुंतवणुकीस उशीर केल्याची प्रत्यक्ष किंमत 

तुम्ही एखादे आर्थिक उद्दिष्ट ठरेविलेले असो वा नसो, तुम्ही तुमच्या बचतीसाठी आणि गुंतवणुकींसाठी लगेच काम सुरू करायला हवे. उशीर लावल्यास मोठी किंमत चुकवावी लागू शकते. जर तुम्हाला चक्रवाढ दराने होणार्‍या वाढीची शक्ती माहित असेल, तर तुम्ही हे जाणता की वेळ तुमच्या गुंतवणुकीत भरपूर पैसा जोडू शकतो. एका उदाहरणासह आपण हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. 

तुम्हाला माहिती आहे की सेवानिवृत्तीचे नियोजन करणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर बचत करणे सुरू केले पाहिजे. तुम्ही 27 वर्षांचे आहात आणि तुम्हाला वाटते की तुमच्या निवृत्तीवर काम करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. तुम्ही 5,000 रुपयांच्या मासिक एसआयपीसह 30 व्या वर्षी सुरू करण्याचे ठरवता. तथापि, तुम्ही 30 वर्षांचे झाल्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. समजा, तुझं लग्न झालं. त्यामुळे तुम्ही काही वर्षांसाठी निवृत्तीचे नियोजन थांबवले. 35 व्या वर्षी, तुम्ही ठरवता की आता बास आणि म्युच्युअल फंडात महिन्याला 7,500 रुपये गुंतवणे सुरू करता. प्रत्येक परिस्थितीत तुमचा धनसंचय असा दिसेल: 

तपशील

25 व्या वर्षी सुरू

30 व्या वर्षी सुरू

35 व्या वर्षी सुरू

सेवानिवृत्तीची वेळ (तुम्ही 60 व्या वर्षी निवृत्त होता असे गृहीत धरून) (अ)

35

30

25

दरमहा गुंतवणूक केलेली रक्कम (ब)

Rs 5,000

Rs 5,000

Rs 7,500

गुंतवणुकीवर गृहीत धरलेला परतावा*

10%

10%

10%

गुंतवणूक केलेली रक्कम

Rs 21,00,000

Rs 18,00,000

Rs 22,50,000

परताव्यासह जमा झालेला एकूण कॉर्पस (जोखमीच्या अधीन)

Rs 1,89,83,190

 

Rs 1,13,96,627

Rs 99,51,251

 

विलंबित गुंतवणुकीची किंमत

-

Rs 41,78,748

Rs 90,31,940

 

*वरील गणना केवळ उदारहरणादाखल आहेत. गुंतवलेल्या रकमेची गणना सूत्र वापरून केली गेली: a*b*12. विलंबाची किंमत कॅल्क्युलेटरचा वापर करून परताव्यासह जमा झालेल्या एकूण निधीची गणना केली गेली. विलंबित गुंतवणुकीची किंमत 25 वर्ष वयापासून तयार केलेल्या एकूण कॉर्पसमधून विशिष्ट वयात जमा झालेल्या एकूण कॉर्पसची वजा करून निर्धारित केली जाते.

तुम्ही बघू शकता की, तुम्ही तुमची मासिक एसआयपी वाढवली तरीही गुंतवणुकीस उशीर करण्याची किंमत खूप मोठी असते. 25व्या वर्षी 5,000 च्या एसआयपीसह अंतिम रकमेची बरोबरी करायची असेल तर, तुम्हाला तुम्ही 35 व्या वर्षी सुरू केल्यास दरमहा 14,300 रुपये गुंतवावे लागतील. तुमच्या गुंतवणुकीला काही वर्षे उशीर होण्याची ही फार मोठी किंमत नाही का? 

उशीर होण्याची किंमत काढणार्‍या कॅल्क्युलेटरचा वापर करून, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला उशीर केल्यास तुम्हाला किती पैसे गमवावे लागतील याचा अंदाज लावू शकता. 

गुंतवणूक लवकर का सुरू करावी?

1. वेळ तुमच्या बाजूने आहे
लवकर गुंतवणूक केल्याने वेळेचा फायदा होतो. तुमची गुंतवणूक जितकी जास्त वेळ ठेवली जाईल तितका जास्त वेळ त्यांना वाढायला आणि परतावा जमा व्हायला लागेल. याचा अर्थ असा की अगदी सुरुवातीला केलेल्या छोट्या गुंतवणुकीतूनही कालांतराने लक्षणीय संपत्ती निर्माण होण्याची क्षमता असते.

2. चक्रवाढ व्याज
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला चक्रवाढ शक्तीचा फायदा घेता येतो. चक्रवाढ व्याज म्हणजे जेव्हा तुमची गुंतवणुकीची कमाई पुन्हा गुंतवली जाते आणि ती स्वतः परतावा निर्माण करते. कालांतराने, चक्रवाढ शक्तीमुळे तुमच्या गुंतवणुकीत अनेक पटींनी वाढ होऊ शकते. 

3. गुंतवणुकीचे अधिक पर्याय
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला विविध गुंतवणूक पर्याय आणि धोरणे शोधण्यासाठी अधिक वेळ मिळतो. जर एक पर्याय काम करत नसेल, तर तुम्ही तुमची रणनीती कधीही बदलू शकता. 

4. दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करणे
लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला सेवा-निवृत्ती, घर खरेदी करणे किंवा मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची सोय करणे यासारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होते. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त वेळ तुम्हाला ही उद्दिष्टे गाठण्यासाठी लागणारी संसाधने तयार करण्यासाठी लागेल.

निष्कर्ष 
गुंतवणुकीस उशीर करण्याची किंमत खूप मोठी असू शकते आणि त्यामुळे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांमध्ये अडथळा येऊ शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे किंवा एकरकमी गुंतवणूक करा, शक्य तितक्या लवकर सुरू केल्याने तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होऊ शकते. प्रॉडक्ट/स्कीम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड तज्ञाचा सल्ला घेऊ शकता.


अस्वीकरण 

एएमएफआय म्युच्युअल फंड योजनांच्या विविध प्रवर्गांबद्दलची वेबसाइटवर वितरित माहिती देण्याच्या हेतुकरिता, म्युच्युअल फंड्सविषयी एक वित्तीय उत्पादन प्रवर्ग म्हणून जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणत्याही विक्री प्रचारासाठी नाही किंवा व्यवसायाच्या शिफारससाठी नाही.

येथे दिलेला मजकूर एएमएफआय द्वारे जाहीररीत्या उपलब्ध माहितीच्या, अंतर्गत स्रोतांच्या आणि इतर त्रयस्थ स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून विश्वसनीय मानला जातो. परंतु, अशा माहितीच्या अचूकतेविषयी एएमएफआय हमी देऊ शकत नाही, तिच्या पूर्णत्वाविषयी आश्वासन देऊ शकत नाही किंवा ही माहिती बदलणार नाही असे वचन देऊ शकत नाही.

सदर मजकूर वैयक्तिक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता किंवा आर्थिक गरजा किंवा परिस्थिती किंवा येथे वर्णिलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांची अनुकूलता विचारात घेत नाही. म्हणूनच, गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूकदार सल्लागारांचा / समुपदेशकांचा / कर सल्लागारांचा ह्या संदर्भात गुंतवणुकीसाठीचा सल्ला घ्यावा. 

म्युच्युअल फंड योजना ही ठेव योजना नसते आणि म्युच्युअल फंडद्वारे किंवा त्याच्या एएमसीद्वारे तशा बंधनकृत, हमीकृत किंवा विमेकृत नसते. त्यामध्ये अंतर्भूत गुंतवणुकांच्या स्वरूपामुळे, म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंवा संभाव्य उत्पन्नाची हमी देता येत नाही. ऐतिहासिक कामगिरी जेव्हा सादर होते तेव्हा ती फक्त संदर्भाच्या हेतुकरिता असते आणि भावी परिणामांची हमी नसते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे