संभाव्य लाभ मिळवण्यासाठी जोखमीमध्ये विविधता आणा

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जोखमीवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. आणि म्युच्युअल फंड्स लाभ देणारे असू शकतात.

जेव्हा आपण गुंतवणुकीत “जोखीम” आहे असे म्हणतो, तेव्हा गुंतवणूकदाराच्या मनामध्ये लगेचच काही प्रश्न येतात... “माझे पैसे सुरक्षित आहेत का?” “मला किती परतावा मिळेल?” “मला हवे तेव्हा पैसे परत मिळतील का?”... हे सर्व प्रश्न वैध असले तरी, म्युच्युअल फंड्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी, त्यांच्याकडे तीन कोनांतून बघू. प्रोफेशनल फंड व्यवस्थापन – म्युच्युअल फंड्स

प्रोफेशनल फंड व्यवस्थापकांकडून - व्यवस्थापित केले जातात आणि एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला त्यांनी केलेल्या संशोधनाचा आणि त्यांच्या कौशल्याचा फायदा होतो. ह्यामुळे जोखीम संपूर्णपणे टाळता येत नसली तरी ती कमी होते. 

विविधीकरण(डायवर्सिफिकेशन) - म्युच्युअल फंड्स सिक्युरिटीजच्या एका टोपलीत गुंतवणूक करतात. विविधीकरण एका ठराविक सिक्युरिटीच्या कमी झालेल्या कामगिरी मुळे निर्माण झालेली जोखीम कमी करायला मदत करतात.

आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टाशी संलग्न असलेली स्किम निवडा– जर गुंतवणुकीच्या वेळेची सीमा आपण निवडलेल्या फंड बरोबर समकालिक, असेल, तर आपण स्वतःला अत्यंत अल्पकालीन चढ-उतारांपासून सुरक्षित करता. उदा. जर आपण इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक केली असेल, तर आपल्यावर अल्पकालीन चढउतारांचा परिणाम होईल, पण दीर्घ कालावधीत आपल्याला इक्विटीवर मिळणारे परतावे मिळण्याची शक्यता अधिक असते. 

बहुतेक लोक असे समजतात की म्युच्युअल फंड्स जोखमीचे असतात, कारण ते म्युच्युअल फंड्सच्या जाहिरातींबरोबर दाखविले जाणारे प्रमाणित निवेदन बघतात. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की गुंतवणूकदारांची सुरक्षितता प्रोफेशनल फंड व्यवस्थापन आणि विविधीकरण यांची खात्री करणारे कठोर नियामक मोठ्या प्रमाणात जोखीम कमी करतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे