गुंतवणूक सुरू करण्याआधी मला स्टॉक, बाँड किंवा मनी मार्केटची माहिती करून घेणे गरजेचे आहे का?

गुंतवणूक सुरू करण्याआधी मला स्टॉक, बाँड किंवा मनी मार्केटची माहिती करून घेणे गरजेचे आहे का?

म्युच्युअल फंड सही आहे?

कल्पना करा की आपल्याला एखाद्या लांबच्या देशाला जायचे आहे आणि त्यासाठी विमानाचा प्रवास हा एकमेव पर्याय आहे.

तर त्यासाठी आपल्याला विमान कसे उडते आणि त्याचे निरनिराळे भाग काय आहेत याची माहिती करून घेण्याची गरज आहे का? किंवा निरनिराळ्या कंट्रोल टॉवर्स कडून पायलटला मिळणारे संकेत समजून घेण्याची गरज आहे का? किंवा त्यातील रेडिओ सिस्टिम कशी चालते वगेरे?

जर आपण ते विमान उडवणार नसलात, तर ह्याची मुळीच गरज नाही. जर आपण फक्त एक प्रवासी असाल, तर आपल्याला फक्त हे समजून घ्यावे लागेल की आपली गरज पूर्ण होते आहे किंवा नाही, आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपली गरज नक्की काय आहे.

गुंतवणुकीच्या बाबतीत, जर आपण स्वतःच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन स्वतः करत असाल, तरच आपल्याला स्टॉक बाँड आणि मनी मार्केटची माहिती करून घ्यावी लागेल. पण जर आपण आपली वित्तीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड्स वापरणार असलात, तर आपल्याला स्टॉक, बाँड आणि मनी मार्केटची माहिती करून घेण्याची गरज नाही. आपल्याला फक्त ही माहिती करून घ्यायला हवी की निरनिराळ्या उद्दिष्टांसाठी कुठल्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत.

म्युच्युअल फंड्सचा आधार घ्या आणि एका तज्ज्ञ फंड व्यवस्थापन टीमला ते वाहन चालवण्याचे काम करू द्या. फक्त आपल्या प्रवासासाठी योग्य वाहनाची निवड करा आणि निश्चिंत व्हा.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे