मला म्युच्युअल फंड मध्ये थेट (डायरेक्ट) गुंतवणूक कशी सुरू करता येईल?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जर आपले केवायसी पूर्ण झालेले असेल, तर आपण म्युच्युअल फंडमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन मार्ग निवडू शकता. जर आपल्याला ऑनलाइन व्यवहार करणे सोयीचे वाटत नसेल, तर आपण कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता.  

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन हा प्रकार सर्वात सोयीचा आहे आणि तसे केल्याने आपण कमीशनची बचत सुद्धा करू शकता. आपण फंडच्या वेबसाईटवरून किंवा आरटीएच्या वेबसाईटवरून किंवा  एखाद्या फिनटेक प्लॅटफॉर्मवरून  ऑनलाइन गुंतवणूक करू शकता. फंडच्या वेबसाईटवरून थेट गुंतवणूक केल्याने आपल्याला अनेक लॉग इनचे व्यवस्थापन करावे लागू शकते.

डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा अर्थ असा होतो की आपल्याला आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो, आपल्या उद्दिष्टांसाठी योग्य असे फंड निवडावे लागतात आणि गरज पडल्यास फेरबदल(रीबॅलंसिंग) करण्यासाठी नियमितपणे आपल्या पोर्टफोलिओकडे लक्ष ठेवावे लागते. योग्य फंड निवडून पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी पाहिजे तेवढे ज्ञान सर्वांकडे असतेच असे नाही. त्यामुळे डायरेक्ट प्लॅन अशा गुंतवणूकदारांसाठी असतात जे ही कामे सहज करू शकतील. इतरांसाठी, म्हणजे म्युच्युअल फंडबद्दल फारशी माहिती नसलेल्यांसाठी, एखाद्या वितरकाच्या माध्यमाने गुंतवणूक करणेच योग्य असते.  

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे