एखादी व्यक्ती म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा मागोवा कसा घेऊ शकेल?

एखादी व्यक्ती म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा मागोवा कसा घेऊ शकेल? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड सही आहे?

या डिजिटल आणि माहितीच्या युगामध्ये, गुंतवणूक आणि पोर्टफोलिओची कामगिरीचा मागोवा घेणे बरेच सोपे झालेले आहे. आपल्या वित्तीय प्रवासामध्ये सल्लागार हे जरी महत्त्वाचे भागीदार असले तरी, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल थोडी माहिती असणे गरजेचे आहे. चिंता करू नका, आपल्याला अवाढव्य स्प्रेडशीट आणि ग्राफ घेऊन बसायचे नाहीये.

एखाद्या सल्लागारामार्फत किंवा मध्यस्थामार्फत गुंतवणूक केली तर आपल्याला आपला पोर्टफोलिओ आणि स्किमच्या कामगिरीबद्दल नवीन माहिती आणि मूल्यमापनाचे अहवाल मिळतात. असे अहवाल नसले तरीही, अनेक वेबसाईट आणि मोबाइल अ‍ॅप आहेत ज्या स्किमच्या कामगिरीचा मागोवा घेत असतात. अशा काही साईटवर एखादा विशिष्ट पोर्टफोलिओ बनवून त्याचा मागोवा घेतला जाऊ शकतो. प्रसिद्ध व्यावसायिक वर्तमानपत्रे नियमितपणे म्युच्युअल फंड्सचा आढावा घेत असतात आणि त्यांवर भाष्य करीत असतात.

तसेच, आपण फंड फॅक्ट शीट वापरून आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेऊ शकता. हा एक एक-पानी दस्तऐवज असतो ज्यात एका म्युच्युअल फंड स्किमचा आढावा घेतलेला असतो आणि स्किमच्या आणि पोर्टफोलिओच्या कामगिरीवर भर असतो आणि याचे प्रकाशन प्रत्येक म्युच्युअल फंडाद्वारे दर महिन्याला केले जाते. हे एका प्रगती पत्रकासारखे असते ज्यात त्या स्किमच्या आरोग्याबद्दल माहिती दिलेली असते.

डावीकडील इन्फोग्राफिक मध्ये आपण एका फॅक्ट शीटचे उदाहरण पाहू शकता.

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे