तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे नियोजन करण्यासाठी म्युच्युअल फंडाचा वापर कसा करावा?

तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे नियोजन करण्यासाठी म्युच्युअल फंडाचा वापर कसा करावा? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

तुमच्या मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी बचत करण्याचे विविध मार्ग आहेत. महागाईचा दर लक्षात घेता, शिक्षणासाठी निधी म्हणून एक कॉर्पस जमा करण्यासाठी बचत करण्याऐवजी गुंतवणूक करणे हा एक अधिक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड हे एक असे गुंतवणुकीचे साधन आहे जे तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करण्यात मदत करू शकते. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला इक्विटी मार्केटची ओळख होते आणि त्याचबरोबर वैयक्तिक शेअरमध्ये गुंतवणुकीच्या जोखमीत विविधता येते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत: एकरकमी आणि एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). शैक्षणिक हेतू हे उद्दिष्ट गृहीत धरल्यास एसआयपी हा सर्वोत्तम मार्ग आहे. 

उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 15,000 रुपये 10 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवले तर परताव्याचा दर वार्षिक 12% आहे असे गृहीत धरून तुम्ही 34,85,086 रुपयांचा निधी जमा करता. 

तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा आदर्श पर्याय का आहे:

  • ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. 
  • फायदेशीर परताव्याची क्षमता असते. 
  • व्यावसायिक फंड व्यवस्थापनाचा पैलू आहे. 
  • यात लवचिकता आणि लिक्विडिटी असते. 
  • जास्तीत जास्त परिणामासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणू शकता. 
  • हा गुंतवणुकीचा एक कस्टमाईज करता येण्याजोगा पर्याय आहे. 
  • त्यात करसवलतीही असतात. 
  • तुम्ही एसआयपी पद्धत किंवा एकरकमी गुंतवणूक निवडू शकता. 

 

मुलाचे उच्च शिक्षण हा कोणत्याही पालकांसाठी गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाचा खर्च हा देखील या आर्थिक उद्दिष्टाला एक महत्त्वपूर्ण पैलू बनवणारा आणखी एक घटक आहे. या उद्दिष्टासाठी पैसे निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे, ज्यामुळे त्यांना इक्विटी बाजाराचे अप्रत्यक्षपणे साक्षीदार होता येते (जर इक्विटी सर्वाधिक परतावा देण्यासाठी ओळखल्या जात असतील तर).

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

 

452
290
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे