म्युच्युअल फंडचा ट्रॅक रेकॉर्ड कसा शोधावा?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत जेव्हा लोक आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय फार माहिती न काढता घेत होते, जसे कार खरेदी करणे किंवा लग्न करणे. आजच्या काळात माहिती तर आपल्या बोटांवरच उपलब्ध असते. काय खावे या सारख्या लहान गोष्टींसाठी सुद्धा काही प्रमाणात शोधाशोध किंवा तुलना केली जाते, तर म्युच्युअल फंड सुद्धा याला अपवाद नाहीत. जर फंड्सच्या निरनिराळ्या प्रकारांचा आणि त्यांतील सर्व स्किमचा छडा लावणे आपल्याला कठीण जात असेल, तर काळजी करू नका.

या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला फक्त एका विश्वसनीय वेबसाईटवर जावे लागेल, जिथे प्रत्येक श्रेणीतील स्किमची तुलना केलेली आहे. आपण जुने प्रदर्शन, फंडचा जोखीम प्रोफाइल, फंड सुरू होण्याची तारीख आणि फंडचा आकार अशा सर्व बाबी पाहू शकता. सर्व स्किमचे प्रदर्शन एकाच ठिकाणी पाहाण्यासाठी www.mutualfundssahihai.com/schemeperformance ला भेट द्या.

आपण कुठल्याही श्रेणीतील सर्व स्किमचा परतावा पाहू शकता आणि त्या स्किमच्या प्रदर्शनची तुलना त्याच्या बेंचमार्क परताव्याशी करू शकता, तसेच त्याच श्रेणीतील इतर स्किमच्या तुलनेत प्रदर्शन कसे होते हे सुद्धा पाहू शकता. सर्वात उत्तम म्हणजे, आपण फंडची मागील कामगिरी त्याच्या बेंचमार्कशी तुलना ग्राफच्या स्वरूपात पाहू शकता ज्याने आपल्याला निरनिराळ्या कालावधींसाठी त्याचा ट्रॅक रेकॉर्ड रेग्युलर आणि डायरेक्ट दोन्ही प्लॅनसाठी नीट समजू शकेल.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे