मी माझे पैसे किती वेळा काढू शकतो?

मी माझे पैसे किती वेळा काढू शकतो?

म्युच्युअल फंड सही आहे?

ओपन एंडेड स्किममधून गुंतवणूकदाराला पैसे काढण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. काही बाबींमध्ये कदाचित एक्झिट लोड (निर्गमन भार) लागू शकतो, ज्याचा परिणाम शेवटी जी रक्कम आपल्याला मिळणार आहे त्यावर होऊ शकतो, सगळ्या ओपन एंडेड स्किम्स ह्या उत्तम फायद्यासह रोख रक्कम देतात.

रक्कम काढण्याचा निर्णय हा सर्वस्वी गुंतवणूकदाराच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असतो. किती वेळा रक्कम काढायची किंवा किती रक्कम काढायची ह्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. फंडातून रक्कम काढण्यासाठी फक्त पुरेसे युनिटस खात्यामध्ये असणे गरजेचे असते. स्किमच्या दस्तऐवजामध्ये साधारणतः कमीत कमी काढता येऊ शकणारी रक्कम दिलेली असते.

बँक किंवा संस्थेला बांधील असलेले युनीट्स ग्रहणाधिकार काढल्याशिवाय रक्कम काढण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. विश्वस्त मंडळाने ठरवल्याप्रमाणे काही ठराविक विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा येऊ शकतात.

क्लोज्ड एंड स्किम्समधून एएमसी (AMC )मार्फत स्किमची पूर्तता झाल्यावरच रक्कम काढता येऊ शकते. परंतु, ते पूर्तता होण्याआधी देखील युनिट्स एखाद्या मान्यताप्राप्त एक्स्चेंजला विकून रोख रक्कम काढण्याचा मार्ग देतात.-.

रक्कम काढण्याची प्रक्रिया ही इथे करता येऊ शकते:

  • इनव्हेस्टर सर्व्हिस सेंटर (गुंतवणूकदार सेवा केंद्र)
  • एएमसी ऑफिस
  • ऑफिशियल पॉइंट्स ऑफ अ‍ॅक्सेप्टन्स ऑफ ट्रान्झॅक्शन (OPAT) इथे होते
  • एखाद्या अधिकृत ऑन लाईन व्यासपिठावरुन.
458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे