गुंतवणुकीसाठी एखादी गुंतवणूकदार व्यक्ती योग्य प्रकारच्या म्युचुअल फंड्सची निवड कशी करू शकते?

गुंतवणुकीसाठी एखादी गुंतवणूकदार व्यक्ती योग्य प्रकारच्या म्युचुअल फंड्सची निवड कशी करू शकते? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओसाठी फंडची निवड ही नवीन कपड्यांच्या निवडीप्रमाणेच असते, फक्त निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते एवढेच. ज्याप्रमाणे आपण एखादा शर्ट किंवा ड्रेस निरखून पहाता, त्याची फिटिंग, घट्ट किंवा सैलपणा, त्याची खरेदी ज्या कारणास्तव करीत आहात त्यासाठी ते योग्य आहे किंवा नाही हे ठरवता, तसेच आपल्या पोर्टफोलिओसाठी इक्विटी म्युच्युअल फंडची निवड करताना करावे लागते.

इक्विटी म्युच्युअल फंडसाठी शॉपिंग सुरू करण्याआधी आपल्याला आपला पोर्टफोलिओ तपासावा लागतो. जसे आपण आपल्याकडे आधीपासून असलेल्या कपड्यांपेक्षा निराळे कपडे खरेदी करतो, तसेच आपल्याकडे आधीपासून कुठल्या प्रकारची गुंतवणूक आहे आणि आता कशाची गरज आहे याकडे लक्ष द्या. असे असू शकते की आपल्याकडे आधीपासून काही इक्विटी गुंतवणूक केलेली असेल किंवा इक्विटी मुळीच नसेल असे सुद्धा असू शकते. त्यामुळे नवीन इक्विटी फंड घेतल्यावर त्याने आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील एखादी उणीव भरून काढली पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपण आधीच एखाद्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर आपण निराळ्या प्रकारच्या इक्विटी फंडचा विचार करू शकता जो आपल्या जोखीम पत्करण्याच्या तयारी आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टाप्रमाणे असेल, जसे मल्टी कॅप किंवा मिड कॅप फंड. जर आपले उद्दिष्ट कर-बचत करणे असेल तर आपण कर-बचतीच्या फंडकडे सुद्धा पाहू शकता. निरनिराळ्या प्रकारच्या फंड्सद्वारे आपण आपल्या इक्विटी मालमत्तेचा जोखीम हाताळला पाहिजे.

यानंतर या फंडकडे त्याच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट, सेक्टर आणि स्टॉक होल्डिंगचा पोर्टफोलिओ, फंड मॅनेजर, फंड केव्हापासून काम करीत आहे, त्यातील जोखमीचे घटक, खर्चाचा गुणोत्तर इत्यादि बाबींच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. आपण कपडे खरेदी करताना स्टाइल, रंग, कापड आणि फिनिशिंग बघतो तसेच हे आहे. त्यानंतर आपण त्याकडे या दृष्टीने बघता की तो आपल्या गरजेप्रमणे आहे किंवा नाही. तसेच निवडलेला फंड आपल्या उद्दिष्टाला पूरक असा असला पाहिजे. यावेळी आपण बेंचमार्क विरुद्ध फंडची कामगिरीकडे लक्ष देणे योग्य असते.

पुढच्या वेळी आपणास म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास, वरील नमूद निवडीसंबंधी असलेल्या निकषांचे पद्धतशीरपणे पालन करावे किंवा मदतीसाठी वित्त तज्ञाची मदत घ्यावी. 

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे