दोन स्किम्सच्या कामगिरीमध्ये कशाप्रकारे तुलना केली गेली पाहिजे

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

जेव्हा आपल्याला एखादी कार खरेदी करायची असते तेव्हा आपण त्यांची तुलना कशी करता? आपण आधी नवनवीन मॉडेल ठरवता की कशा प्रकारची कार घ्यायची ते ठरवता? जर आपला निर्णय अजूनही झालेला नसेल, तर आपण एखाद्या डीलरकडे जाता आणि ते तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारतात की आपल्याला कुठल्या प्रकारची कार पाहिजे, म्हणजे SUV, हॅचबॅक, सेडान? 

तसेच म्युच्युअल फंड स्किमच्या कामगिरीच्या तुलनेसाठी सुद्धा केले जाते. आपण निरनिराळ्या प्रकारच्या स्किमच्या कामगिरीची तुलना करू शकत नाही. समान गुंतवणूकीचे उद्दिष्ट, मालमत्ता वितरण आणि समान बेंचमार्क इंडेक्स असलेल्या समान श्रेणीतील स्किम्सची तुलना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या SUV ची तुलना सेडानशी करू शकत नाही कारण दोन्हीचे डिझाइन निराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले आहे, त्याच प्रमाणे निराळ्या गुंतवणूक उद्दिष्टांसाठी तयार केलेल्या स्किम्समध्ये जोखमींचा स्तर निराळा असू शकतो. पण जेव्हा आपण एकाच बेंचमार्कला फॉलो करणाऱ्या स्किम्सची तुलना करतो, तेव्हा ते समान इंजिन सिस्टमसह डिझाइन केलेल्या दोन कारच्या कामगिरीची तुलना करण्यासारखे असते.. दोन ब्ल्यूचिप फंड्सची किंवा दोन स्मॉल कॅप फंड्सची तुलना योग्य आहे, पण तुम्हाला ब्ल्यूचिप फंडाची कामगिरीची तुलना स्मॉल कॅप फंडाशी करून चालणार नाही जरी त्या दोन्ही इक्विटी स्किम्स असल्यातरी. जसे आपण एखाद्या कारच्या मायलेजची तुलना शहरात आणि हायवे वर अशी करू शकत नाही, तसेच, एकाच श्रेणीमध्ये सुद्धा आपल्याला एकाच कालावधीसाठी तुलना केली पाहिजे.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे