मी माझे पैसे म्युच्युअल फंड्स मधून लवकरात लवकर कधी काढू शकतो?

मी माझे पैसे म्युच्युअल फंड्स मधून लवकरात लवकर कधी काढू शकतो?

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स हे सर्वात अधिक रोख रक्कम देणारी मालमत्ता आहे, म्हणजेच हा मालमत्ता रोख रकमेत बदलण्याचा सगळ्यात सुलभ मार्ग आहे. ऑफलाईन मार्गाने फंड्सची विक्री करण्यासाठी, युनिट धारकाला स्वतःच्या सहीचा रिडिम्पशन फॉर्म AMC कडे किंवा नोंदणीकृत कार्यालयात करणे गरजेचे असते. अर्जामध्ये युनिट धारकाचे नाव, फोलिओ क्रमांक, स्किमचे नाव आणि किती युनिटची विक्री करायची आहे हे तपशील असणे गरजेचे असते. विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पहिले नाव असलेल्या युनिट धारकाच्या नोंदणीकृत बँक खात्यात पैसे जमा होतात. रिक्वेस्ट, सुपूर्द  

म्युचुअल फंड्स हे संबंधित वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी किंवा विक्री केले जाऊ शकतात. आपल्याला फक्त हव्या असलेल्या म्युच्युअल फंडच्या ‘ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन’ पेजवर लॉग-ऑन करायचे आहे आणि आपला फोलिओ क्रमांक आणि/किंवा PAN वापरून लॉग-इन करुन, स्किमची निवड करायची आहे आणि विक्री करायच्या युनिटची संख्या (किंवा रक्कम) भरून व्यवहार निश्चित करायचा आहे.

तसेच, CAMS (कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.), कार्व्ही वगैरे सारखे रजिस्ट्रार्स आपल्याला वेगवेगळ्या AMC कडून खरेदी केलेले म्युच्युअल फंड विक्री करण्याचा पर्याय देतात. आपण ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करू शकता किंवा जवळच्या ऑफिसला भेटही देऊ शकता. ह्या एजन्सी सगळ्या AMC ला सेवा पुरवत असतील असे नाही ह्याची कृपया नोंद घ्या.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे