इंडेक्स फंड आणि त्यांच्यासोबत निगडित जोखीम

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

इंडेक्स फंड असे निष्क्रियपणे व्यवस्थापित केलेले म्युच्युअल फंड असतात जे सेंसेक्स किंवा निफ्टी यासारख्या एखाद्या लोकप्रिय मार्केट इंडेक्सप्रमाणे हुबेहूब वागतात. इंडेक्स फंडांमधील मार्केटची जोखीम सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या फंडांपेक्षा तुलनेने कमी असते, तसेच मार्केट फार अधिक खाली येताना फंड व्यवस्थापकांकडे त्यावर उपाय म्हणून कृती करण्यासाठी फार वाव नसतो. याचे कारण म्हणजे इंडेक्स फंडकडे त्याच्या इंडेक्समधील अनुपातामध्येच सर्व रोखे असावे लागतात. त्यामुळे मार्केट अशा प्रकारे खाली येत असताना ते एखाद्या फार खाली आलेला स्टॉक अधिक प्रमाणात खरेद करू शकत नाहीत किंवा एखाद्या स्टॉकची किंमत फार वाढलेली असल्यास त्याला विकू शकत नाहीत. 

इंडेक्स फंड विविक्षित मार्केट इंडेक्सना फॉलो करत असतात, त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रतिष्ठित रोखे असतात ज्यांचे विविक्षित मार्केट विभाग असू शकतात, जसे लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, बँकिंग स्टॉक, कॉर्पोरेट बाँड इत्यादी. त्यामुळे गुंतवणूकदाराला आवडीप्रमाणे निवड करता येत नाही. 

एखाद्या मार्केट इंडेक्सप्रमाणेच पोर्टफोलिओ असला तरीही या फंडांचा परतावा त्यांच्या मार्केट इंडेक्सप्रमाणे नसतो आणि याचे कारण असते ट्रॅकिंगमधील त्रुटी. एखाद्या मार्केट इंडेक्समधील स्टॉकची संख्या बदलली, म्हणजे एखादा स्टॉक त्यातून काढण्यात आला किंवा त्यात एखाद्या स्टॉकची भर घालण्यात आली, तर त्या इंडेक्सला त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. त्याउलट इंडेक्स फंडला इंडेक्सची हुबेहूब नक्कल करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये अशाप्रकारे बदल करताना व्यवहार करावे लागतात ज्यासाठी खर्च करावा लागतो. तसेच, एखाद्या इंडेक्समधील स्टॉक बदलले किंवा त्या इंडेक्समध्ये एखाद्या स्टॉकची टक्केवारी बदलली तर फंडने त्याप्रमाणे खरेदी-विक्री करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. या खर्चामुळे इंडेक्स फंडचा परतावा त्याखालच्या मार्केट इंडेक्सच्या तुलनेने कमी होतो. 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे