पैसा अडकून राहत नाही. तो गुंतवला जातो!

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्समध्ये पैसा अडकून राहत नाही. तो गुंतवला जातो!

म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, सर्वात अधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “माझा पैसा अडकून राहील का?”

ह्यासाठी दोन गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे:

अ. कुठल्याही म्युच्युअल फंड स्किममध्ये पैसा गुंतवला जातो, तो अडकत नाही, आणि पैसा नेहमी आपल्याचं नावावर राहतो. फक्त त्याचे व्यवस्थापन एका प्रोफेशनल फंड व्यवस्थापकाद्वारे केले जाते.

ब. आपला पैसा नेहमी सहजपणे उपलब्ध असतो. म्युच्युअल फंडची रचनाच अशी असते की आपला पैसा आपल्यासाठी कायम परिवर्तनशील राहील. आपण आपले गुंतवणुकीचे पैसे अंशतः किंवा पूर्णतः काढून घेऊ शकता. आपण म्युच्युअल फंड कंपनीला आगाऊ निर्देश देऊन तसेच पैसे काढून घेण्याची तारीख ठरवून, त्यानंतर एखाद्या ठराविक तारखेला आपल्या बँक खात्यामध्ये, आपल्या निवडीनुसार दर महिन्याला किंवा दर त्रैमासिक एक ठराविक रक्क्म हस्तांतरित करुन घेऊ शकता. आपण आपली गुंतवणूक, एकच व्यवस्थापन असलेल्या म्युच्युअल फंडच्या एका स्किममधून दुसऱ्या स्किममध्येही हस्तांतरीत करू शकता. आणि आपल्याला नेहमी एक व्यापक / समजण्यास सोपे असे अकाऊंट स्टेटमेंट मिळते ज्यात सर्व तपशील व्यवस्थित मांडलेला असतो.

तर आपण आवडीच्या म्युच्युअल फंड स्किममध्ये गुंतवणूक करा आणि परिवर्तनशीलता, पारदर्शकता आणि रोख रकमेची सहज उपलब्धता ह्या सर्व सोयी-सुविधांचा आनंद घ्या. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, आपल्याला प्रोफेशनल व्यवस्थापकांकडून मिळणा-या सेवांबरोबर, गुंतवणुकीचा एक सर्वोत्कृष्ट अनुभवही घेता येईल.

455
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे