उद्दिष्ट नसतानाही मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

दीर्घ कालावधीमध्ये आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात म्युच्युअल फंड आपल्याला मदत करतात. याचा अर्थ असा असतो का, की आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तेव्हाच केला पाहिजे जेव्हा आपल्या मनात एखादे आर्थिक उद्दिष्ट असेल? नाही! आर्थिक उद्दिष्टे मनात नसताना सुद्धा म्युच्युअल फंड अशा लोकांसाठी योग्य आहेत ज्यांना त्यांची बचत वाढवायची असेल किंवा भविष्यात एखादे उद्दिष्ट समोर आले तर आपली तयारी हवी अशी त्यांची विचारसरणी असेल.

संपूर्ण वर्षभर जे खेळाडू आपल्या खेळाचा सराव करत असतात तेच खेळ सुरू झाल्यावर चांगली कामगिरी करतात. त्यांना प्रसिद्धी मिळण्याच्या बराच काळ आधीपासून त्यांची तयारी सुरू झालेली असते. जेव्हा ते तयारीला सुरुवात करतात, तेव्हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करायची असे त्यांच्या मनात देखील नसते. पण जेव्हा शाळेच्या, कॉलेजच्या, राज्याच्या किंवा देशाच्या टीममध्ये निवड होण्याची संधी त्यांना मिळते, तेव्हा ते त्याचे चीज करू शकतात कारण त्यांची चांगली तयारी सतत होत असते.

तसेच काहीसे आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टांचे सुद्धा आहे. जेव्हा आपल्या कमाईला सुरुवात होते, तेव्हा फक्त महिन्याचा खर्च भागवणे याच्या पलीकडे आपले इतर उद्दिष्ट नसूही शकते. पण कमाईची सुरुवात झाल्यावर गुंतवणुकीलाही सुरुवात करावी कारण आयुष्याची पुढे वाटचाल सुरू असताना उद्दिष्टे समोर येतच राहतील, मग ती स्वतःसाठी असोत किंवा आपल्या कुटुंबीयांसाठी. आपण उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक सुरू करता, तेव्हा आयुष्यातील अनेक आर्थिक गरजांना सामोरे जाण्यासाठी आपली अधिक चांगली तयारी असते. तसेच, आपली गुंतवणुकीतील शिस्तसुद्धा अधिक चांगली होत जाते. निधी तयार करण्यासाठी वेळ आणि चिकाटी दोन्हीची गरज असते आणि आपण जेवढे लवकर सुरू करता, आपण कुठलीही आर्थिक गरज भावण्यासाठी तेवढेच सक्षम होत जाता.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे