मग म्युच्युअल फंड्स बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत हे अस्वीकरणमध्ये का म्हटले जाते?

मग म्युच्युअल फंड्स बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत हे अस्वीकरणमध्ये का म्हटले जाते?

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स सिक्युरिटीजमध्ये गुतंवणूक करतात आणि या सिक्युरिटीजचे स्वरूप त्या स्किमच्या उद्दिष्टावर अवलंबून असते.

उदाहरणार्थ, इक्विटी किंवा ग्रोथ फंड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतील. एखादा लिक्विड फंड, डिपॉझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर यांच्यात गुंतवणूक करेल.

ह्या सर्व सिक्युरिटीज 'बाजारात' विकल्या आणि विकत घेतल्या जातात. कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमाने खरेदी केले आणि विकले जातात, हा भांडवल बाजाराचा एक भाग आहे. तसेच, डेब्ट उपकरणे, जसे सरकारीचे रोखे, स्टॉक एक्सचेंजच्याच एका प्लॅटफॉर्मवरून किंवा एनडीएस नावाच्या एका विशेषीकृत सिस्टिमद्वारे खरेदी केले किंवा विकले जाऊ शकतात. सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी हेच बाजार आहेत आणि यातील खरेदी करणारे आणि विकणारे निरनिराळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे, खरेदी करण्याची आणि विकण्याची संपूर्ण प्रक्रिया, तसेच किंमती ठरवणे हे सर्व 'बाजारात’ होते.

कुठल्याही सिक्युरिटीजची किंमत 'बाजारातील शक्तीं'वर अवलंबून असते, आणि बाजार कुठल्याही बातमीवर किंवा घटनेवर आपली कशी प्रतिक्रिया देतो हे माहिती नसते, त्यामुळे बाजाराची दिशा आधीपासून सांगणे फार कठीण असते आणि अल्प कालावधीमध्ये कुठल्याही शेअर किंवा सिक्युरिटीजच्या किंमतीचा अंदाज लावणे अशक्य आहे. त्याच्यां वर प्रभाव टाकणारे अनेक घटक आणि खेळाडू असू शकतात.

त्यामुळे, प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती असायला हवे की सिक्युरिटीजच्या किंमतीसोबत नेहमी एक जोखीम असते आणि त्याचा उगम 'बाजार’ नावाच्या सर्वात महत्त्वाच्या संस्थेकडून होतो. गुंतवणूकदारांना हे सुद्धा माहीत असायला हवे की म्युच्युअल फंड्स या जोखमीला शक्य तेवढे कमी करण्यासाठी तयार केलेले असतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे