कोणत्या गोष्टी म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करतात?

कोणत्या गोष्टी म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करतात?

म्युच्युअल फंड सही आहे?

प्रत्येक म्युच्युअल फंड स्किमचे एक गुंतवणूक उद्दिष्ट असते आणि ते एका नियुक्त फंड व्यवस्थापकाकडून व्यवस्थापित केले जातात, जो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फंडची कामगिरी चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी जबाबदार असतो.

ह्या कामगिरीवर फंड मैनेजमेंट टीमने घेतलेल्या निर्णयांचा, भांडवल बाजारातील विविध टप्प्यांचा, व्यावसायिक आणि अर्थव्यवस्थेतील परिस्थितींचा, आणि संबंधित सूक्ष्म (माइक्रो) व स्थूल (मैक्रो) अर्थशास्त्रीय घटकांचा, इ. परिणाम होत असतो, ज्याचा म्युचुअल फंड स्कीमवर परिणाम होऊ शकतो. सहसा, सर्व फंड मैनेजमेंट टीम्स एक प्रक्रिया राबवतात जिच्यानुसार स्कीमच्या माहिती पत्रकामध्ये मांडल्याप्रमाणे पोर्टफोलिओमधील सिक्युरिटीज्‌ची निवड ठरते. बाजारातील बदलत्या परिस्थितींमधील ह्या सिक्युरिटीज्‌च्या कामगिरीवर अंतिमत: स्कीमची कामगिरी अवलंबून असते. म्हणूनच, विविध ध्येयांसाठी तुम्ही विविध प्रकारच्या म्युचुअल फंड स्कीम्स निवडता आणि विविध कालावधींसाठी विभिन्न म्युचुअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक करून ठेवता. 

फंड व्यवस्थापक संघ किंमत, गुणवत्ता, जोखीम, वित्तीय बातम्यांचा प्रवाह आणि आर्थिक विकास यांच्या आधारावर योग्य निर्णय घेण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतात. निकोप कौशल्ये, प्रभावी प्रक्रिया आणि संबंधित अनुभव हे चांगली कामगिरी करण्यासाठी बांधील आहेत.

परंतु, ह्या कामगिरीचे मोजमाप वास्तविक कालमर्यादेला अनुसरून करणे महत्त्वाचे असते - इक्विटी फंडांसाठी दीर्घकाळ, हायब्रिड फंडांसाठी मध्यम काळ, किंवा लिक्विड फंडांसाठी अत्यल्प काळ. 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत. 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे