एसआयपीचे फायदे काय आहेत?

एसआयपीचे फायदे काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये गुंतवणूकदाराला नियमित अंतराने म्युच्युअल फंडामध्ये ठराविक रक्कम गुंतविण्याची मुभा मिळते. प्राथमिकतः, एसआयपी किंवा (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्हणजे नियमितपणे छोट्या रक्कमा गुंतवणे.

एसआयपीचे प्रमुख फायदे आहेत:

- कोणत्याही गुंतवणूकदारासाठी हा एक सोयीस्कर असा गुंतणुकीचा पर्याय आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराला गुंतवणुकीची रक्कम, मुदत आणि वारंवारता ठरविण्याची मुभा मिळते. एकरकमी पैसे गुंतवणे शक्य नाही अशा लोकांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय आहे.

- यामध्ये गुंतवणूकदाराला अगदी दरमहा 100/- रुपयापासून सुरूवात करत येते.
- यामुळे लोकांना एका शिस्तबध्द गुंतवणुकीची सवय लागते - ज्यामध्ये व्यक्तीला त्यांच्या आवडीनुसार दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रेमासिक पद्धतीने ठराविक रक्कम बाजूला ठेवावी लागते. 
- रुपयाच्या किमतीची सरासरी हा एसआयपीचा एक फायदा आहे. यामुळे कालांतराने तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा खर्च कमी होण्यास मदत होते. यामुळे बाजारातील अस्थिरतेमुळे होणारे परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतात. 
- एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास व्यक्तीला चक्रवाढ पध्दतीचा फायदा मिळतो.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
 

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे