इक्विटी फंड्स म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

इक्विटी फंड ही एक म्युच्युअल फंड्स स्किम आहे जी प्रामुख्याने कंपन्यांच्या शेअर्स/स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करते. त्यांना ग्रोथ फंड्स असे देखील म्हणतात.

इक्विटी फंड्स हे सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन प्रकारचे असतात. एका सक्रिय फंड मध्ये व्यवस्थापक बाजारपेठेचे निरीक्षण करतो, कंपन्यांवर संशोधन करतो, कामगिरीचे परीक्षण करतो आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम स्टॉक्स शोधतो. निष्क्रिय फंड मध्ये, फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ तयार करतो जो एक बाजारपेठेची प्रचलित इंडेक्स प्रतिबिंबित करतो, जसे की सेन्सेक्स किंवा निफ्टी फिफ्टी.

यापुढे, इक्विटी फंड्स हे बाजारपेठेच्या भांडवलीकरणाप्रमाणे विभागले जाऊ शकतात, म्हणजेच एखाद्या संपूर्ण कंपनीच्या इक्विटीला भांडवली बाजारात किती किंमत आहे त्याप्रमाणे ते विभागले जाऊ शकतात. मग ते लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप फंड्स

असू शकतात. येथे डायव्हर्सीफाइड किंवा सेक्टरल/थेमॅटिक असे अजून एक वर्गीकरण देखील असू शकते. आधीच्या काळात ही स्किम संपूर्ण बाजारपेठेच्या क्षेत्रात गुंतवणूक करते, तर नंतरच्या काळामध्ये ती एका ठराविक क्षेत्राशी किंवा थीमशी मर्यादित असते, उदाहरणार्थ इन्फोटेक किंवा पायाभूत सुविधा.

म्हणजेच इक्विटी फंड मूलतः कंपनी शेअर्समध्ये गुंतवणूक करते, आणि सामान्य गुंतवणुकदारांना एका व्यावसायिक व्यवस्थापनाचे लाभ आणि वैविध्य देण्याचे लक्ष्य ठेवते.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे