फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

फिक्स्ड इन्कम फंड म्हणजे अशा म्युच्युअल फंड योजना ज्यांच्या मूलभूत ॲसेट्स फिक्स्ड-इनकम सिक्युरिटीज असतात, जसे की सरकारी सिक्युरिटीज, डिबेंचर्स, कॉर्पोरेट बाँड्स आणि इतर मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स. या फंडांना ढोबळमानाने डेट फंड असेही म्हणतात. कॉर्पोरेट बाँड फंड, डायनॅमिक बाँड फंड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, गिल्ट फंड, लिक्विड फंड इत्यादींचा फिक्स्ड इन्कम फंडांच्या श्रेणीत समावेश होतो.

फिक्स्ड इनकम म्युच्युअल फंडाची वैशिष्ट्ये सामान्यतः ही असतात:

फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक: बाँड्स आणि इतर फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच हे फंड बाँड्स खरेदी करतात आणि गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवतात.

बाजारातील कमी अस्थिरता: फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये अस्थिरता कमी असते आणि बाजारातील विविध चढ-उतारांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो.

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ: डेट फंड हे डेट आणि मनी मार्केट या दोन्ही साधनांमध्ये (जसे की कमर्शियल पेपर्स, ट्रेझरी बिले आणि इतर) गुंतवणूक करतात. यामुळे डेट फंडांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ हे वैशिष्ट्य प्राप्त होते आणि बँक ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. 

फिक्स्ड इन्कम फंडांची अतिरिक्त वैशिष्ट्ये ही आहेत:

  • डेट फंडांना योजनेतील मूलभूत बाँड्स आणि डिबेंचर्समधून व्याज मिळते, तसेच किंमतवाढीचीही शक्यता असते. 
  • तसेच, या फंडांमध्ये सामान्यतः लॉक-इन कालावधी नसतो. याचा अर्थ गुंतवणूकदार त्यांना हवे तेव्हा एक्झिट लोड आणि इतर खर्च असल्यास त्यांच्या अधीन राहून फंडातून पैसे काढू शकतात.
  • फिक्स्ड इन्कम फंडांची तुलना इतर म्युच्युअल फंडांशी (जसे की इक्विटी) केली असता ते तुलनेने कमी जोखीमीचे म्हणून ओळखले जातात. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ संतुलित होऊन आणि एकंदर जोखीम कमी करून तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओला काही प्रमाणात स्थिरता मिळते. 

मात्र, याचा अर्थ असा नाही की हे फंड जोखीममुक्त आहेत. त्यांच्यामध्ये तरीही काही प्रमाणात जोखीम असते. 

अस्वीकरण: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे