अधिभार(लोड) म्हणजे काय?

 अधिभार(लोड) म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

एका लांबच्या प्रवासात काही वेळा आपण एखाद्या मार्गावर प्रवेश करताना किंवा पुलावर जाताना आणि कधीकधी बाहेर पडताना आपल्याला टोल भरावा लागतो. बऱ्याच वेळा, टोल ब्रिज कंपनीला बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी फक्त काही ठराविक वर्षेच टोल आकारण्याची परवानगी असते. तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीला प्रवाशांकडून कोणताही टोल आकारण्याची परवानगी नसते.

म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीवर देखील काही असे अधिभार लागू शकतात, पण ते आपण आत्ताच वाचलेल्या टोलच्या उदाहरणापेक्षा वेगळे असतात. 2009 पर्यंत म्युच्युअल फंड मध्ये प्रवेश करताना त्यावर एक शुल्क आकारले जायचे, पण ते आता लागू केले जात नाही. काही स्किम्स या त्यामधून बाहेर पडताना एक शुल्क लागू करतात, ज्याला “निर्गमन भार (एक्झिट लोड)” असे म्हणतात.

बऱ्याच वेळा जरी निर्गमन भार (एक्झिट लोड) आकारले जात असले, तरी ते एका ठराविक कालावधीमध्ये बाहेर पडतानाच लागू केले जातात. आपण जर या कालावधीपेक्षा अधिक काळ गुंतवणूक केली, तर कोणतेही निर्गमन भार (एक्झिट लोड) लागू होत नाही. दुसर्‍या शब्दात, बऱ्याच वेळा निर्गमन भार (एक्झिट लोड) एका स्किम मधून लवकर बाहेर पडण्यापासून परावृत्त करण्याचा उद्देश साध्य करतो. त्याबरोबरच सेबीने, म्युच्युअल फंड नियामक प्राधिकरणाने देखील जास्तीत जास्त निर्गमन भार (एक्झिट लोड) किती आकारावे यावर काही निर्बंध घातले आहेत.

458
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे