मल्टी कॅप फंड्स म्हणजे काय?

मल्टी कॅप फंड्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपण म्युच्युल फंड्सबद्दल माहिती गोळा करताना XYZ मल्टी कॅप फंड अशा प्रकारची नावे पाहिली असतील आणि विचार केला असेल की हे फंड लार्ज-कॅप फंडपेक्षा निराळे कसे असतात? नावाप्रमाणेच, मल्टी कॅप फंड हे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे चांगले डायव्हर्सिफिकेशन असते.

ऑक्टोबर 2017 मध्ये जारी केलेल्या आणि जून 2018 पासून लागू झालेल्या सेबीच्या प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्सच्या आधारे इक्विटी फंड्सना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये विभागले गेले आहे. भारतात निरनिराळ्या स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक लिस्टिंग केलेल्या अनेक कंपन्या आहेत. लार्ज कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे भारतातील सार्वजिनक लिस्टिंग केलेल्या कंपनींपैकी टॉप 100 कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन = सार्वजनिकरीत्या उपलब्ध शेअर्सची संख्या * एका शेअरची किंमत). मिड कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे क्रमांक 101 पासून 250 पर्यंतच्या कंपन्या, तसेच स्मॉल कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे 251 क्रमांकाच्या कंपनीपासून पुढील इतर कंपन्या.

लार्ज कॅप फंड अशा लार्ज कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतात ज्यांच्या प्रगतीची शक्यता चांगली स्थिर असते, तर स्मॉल कॅप फंड अशा स्मॉल कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतात ज्या सध्या चांगली प्रगति करीत आहेत पण गुंतवणूक तेवढीच जोखमीची आहे. लार्ज कॅप फंड्सचा परतावा कमी, पण स्थिर असण्याची शक्यता असते, तर स्मॉल कॅप फंडचा परतावा अल्प कालावधीमध्ये बराच वर-खाली होण्याची शक्यता असते. मिड-कॅप फंड अशा मिड-कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतो ज्यांची प्रगति करण्याची शक्यता अधिक असते पण स्मॉल कॅप कंपनींप्रमाणे अधिक जोखीम नसतो कारण या कंपनींमध्ये एक निश्चित प्रमाणात स्थिरता आणि क्षमता आलेली असते. मिड कॅप फंड्समध्ये लार्ज कॅप पेक्षा अधिक परतावा मिळू शकतो आणि त्यांत स्मॉल कॅप फंड्सपेक्षा कमी जोखीम सुद्धा असते. तरीही यांत लार्ज कॅप फंड्सपेक्षा अधिक जोखमीचे काही घटक असतातच.

सेबीने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत (11 सप्टेंबर 2020 रोजी) ज्यांत मल्टीकॅप म्युच्युअल फंड्सना मालमत्ता वितरणासाठी निरनिराळ्या मार्केट कॅपिटलायझेशन सेगमेंटची माहिती दिली आहे. मल्टीकॅप फंड्सना त्यांच्या एकूण मालमत्तेचा 75% भाग इक्विटी किंवा इक्विटी संबंधित रोख्यांमध्ये ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमधील किमान 25% मालमत्ता लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये, 25% मिड-कॅप स्टॉक्समध्ये आणि 25% स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये ठेवणे गरजेचे आहे. डायव्हर्सिफिकेशन आणि दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीसाठी मल्टीकॅप ग्रोथ फंड चांगला पर्याय असला तरीही यात जोखीम अधिक असू शकते कारण यातील किमान 50% भाग स्मॉल आणि मिड-कॅप स्टॉक्सचा असतो ज्यांत कमी कालावधीमध्ये अधिक जोखीम असते. मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे कमाल मर्यादा निश्चित केलेली असल्याने फंड व्यवस्थापकाला स्वतःच्या सोयीप्रमाणे निरनिराळ्या मार्केट कॅपच्या स्टॉक्सची निवड करणे कठीण जाते.

आपल्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीकॅप फंड घेण्याआधी गुंतवणूकदारांनी त्यांच्या सध्याच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकींकडे, तसेच सर्व मार्केट कॅपिटलायझेशन सेगमेंटकडे बारकाईने पहावे. मल्टी कॅप फंड अशा लोकांसाठी योग्य नाहीत ज्यांना 5-7 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल किंवा ज्यांना कमी जोखीम पत्करायची असेल.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे