सेक्टरल म्युच्युअल फंड्स म्हणजे काय?

सेक्टरल फंड्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंड सही आहे?

सेक्टरल फंड्स म्हणजे असे फंड्स जे एका विशिष्ट उद्योगातील जसे तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, ऊर्जा किंवा वित्तसुविधा किंवा इतर क्षेत्रातील कंपन्याच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात. किमान 80% निधी त्या क्षेत्रातील स्टॉक्स मध्ये गुंतवतात, त्या क्षेत्राची कामगिरी चांगली झाल्यास परतावा चांगला मिळू शकतो. तथापि, या गुंतवणुक एका विशिष्ट क्षेत्रातील स्टॉक्स मध्ये असल्याने जोखीम जास्त असते.


सेक्टरल फंड्सची वैशिष्ट्ये

सेक्टरल फंड्स काही विशिष्ट क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करत असल्याने त्यांची गुंतवणूक मुख्यतः त्या क्षेत्रातील कंपन्यातच असते, यामुळे जेव्हा ते क्षेत्र चांगली कामगिरी करते तेव्हा उत्तम परतावा मिळतो. तथापि त्या क्षेत्रांची कामगिरी चांगली न होण्याची अतिरिक्त जोखीम देखील असते. परिणामी, या फंडांमधून मिळणारा परताव्या बाबत खात्री देता येत नाही आणि निवडलेल्या क्षेत्रांच्या कामगिरीनुसार त्यात चढ-उतार असू शकतो.

सेक्टरल म्युच्युअल फंड्सचे फायदे

  1. एकाच इंडस्ट्रीमधील विविध कंपन्यामध्ये किंवा असेट्स मध्ये गुंतवणूक करण्याची मुभा.
  2. उत्तम परतावा मिळण्याची शक्यता कारण फंड्स त्या उद्योगातील चांगली कामगिरी असणाऱ्या कंपन्यात गुंतवणूक करण्यावर भर देतात.

जर तुम्हाला एखाद्या क्षेत्राची कामगिरी चांगली होणार असल्याची खात्री वाटत असेल आणि त्यानुसार जास्त धोका घेण्याची तुमची तयारी असल्यास तुम्ही सेक्टरल फंडचा विचार करू शकता.


अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे