टारगेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय?

टारगेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंडबद्दल एकूण जागरूकता वाढते आहे आणि गॅरंटी असलेले सेव्हिंगच्या प्रॉडक्टवर व्याजाचे दर कमी होत आहेत, त्यामुळे बँकेतील मुदत ठेवी, PPF, NSC या सारखे पारंपारिक प्रॉडक्टची सवय असलेले कमी जोखीम पत्करणारे गुंतवणूकदार आता डेब्ट फंडकडे वळत आहेत. अशा गुंतवणूकदारांना इक्विटी फंडच्या तुलनेत डेब्ट फंडमध्ये चढ-उतार कमी आहे असे वाटते आणि मुदत ठेवी, PPF, NSC सारखे पारंपारिक प्रॉडक्टपेक्षा अधिक कर-कार्यक्षम असतात आणि यांत अधिक परतावा मिळण्याची शक्यता सुद्धा असते. तरीही, गुंतवणूकदारांना डिफॉल्ट रिस्क म्हणजे मुद्दल गमावण्याची, व्याज गमावण्याची आणि व्याज दरांमध्ये चढ-उतार होण्याची जोखीम यांना सामोरे जावेच लागते.

टार्गेट मॅच्युरिटी फंड (TMFs) गुंतवणूकदारांना त्यांचे पोर्टफोलिओ फंडाच्या मॅच्युरिटी तारखेशी संरेखित(अलाइन) करून डेट फंडाशी संबंधित जोखीम अधिक चांगल्या प्रकारे नेव्हिगेट करण्यात मदत करतात. हे असे निष्क्रिय डेब्ट फंड असतात जे त्यातील मूलभूत बाँड इंडेक्सला ट्रॅक करतात. त्यामुळे, अशा फंडच्या पोर्टफोलिओमध्ये तेच बाँड असतात जे मूलभूत इंडेक्समध्ये असतात आणि या बाँडच्या मॅच्युरिटीच्या तारखा फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेच्या जवळ-पास असतात. पोर्टफोलिओमधील बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात आणि या संपूर्ण कालावधीमध्ये मिळालेले व्याज पुन्हा फंडमध्येच गुंतवले जाते. अशा प्रकारे, टारगेट मॅच्युरिटी बाँड फंड FMP प्रमाणेच एकत्र करण्याच्या(जमा) मोडमध्ये काम करतात. तरीही, FMP च्या विपरीत TMF ओपन-एंडेड असतात आणि त्यांना टारगेट मॅच्युरिटी डेब्ट इंडेक्स फंड किंवा टारगेट मॅच्युरिटी बाँड EFT या रूपांमध्ये देऊ केले जाते. तर, TMF मध्ये FMP पेक्षा अधिक लिक्विडिटी असते.

कालावधीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर TMF च्या पोर्टफोलिओमध्ये एकसंधपणा(होमोजिनियस) असतो कारण फंडच्या पोर्टफोलिओमधील सर्व बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात आणि सर्व बाँडच्या मॅच्युरिटीच्या तारखा फंडच्या मॅच्युरिटीप्रमाणेच असतात. बाँडना मॅच्युरिटीपर्यंत बाळगल्यामुळे या फंडचा कालावधी वेळेनुसार कमी होत जातो आणि म्हणूनच गुंतवणूकदारांना व्याज दरातील चढ-उतारांमुळे कमी-जास्त होणाऱ्या किंमतीची काळजी कमी करावी लागते.

सध्या TMF ना सरकारी रोखे, PSU बाँड आणि SDL (राज्य विकास कर्ज) यांमध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळे यांमधील डिफॉल्ट जोखीम इतर डेब्ट फंडपेक्षा कमी असते. हे फंड ओपन-एंडेड असल्यामुळे बाँड जारी करणाऱ्या संस्थेवर एखादे संकट आल्यावर, जसे की डिफॉल्ट होण्याची शक्यता वाढल्यावर किंवा क्रेडिट रेटिंग कमी झाल्यावर, गुंतवणूकदार आपली गुंतवणूक यातून काढून घेऊ शकतात.

टारगेट मॅच्युरिटी फंड ओपन-एंडेड असले आणि लिक्विडिटीची खात्री असली तरीही त्यांना मॅच्युरिटीपर्यंत बाळगले पाहिजे कारण अशाने त्यांवरील परतावा बराचसा स्थिर होतो आणि पहिल्यांदा पारंपारिक ठेवींपासून डेब्ट फंडकडे वळणाऱ्या गुतंवणूकदारांसाठी हे फार महत्त्वाचे आहे.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे