अती-अल्पावधी फंड्स (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) बद्दल तुम्हाला हे माहीती असणे आवश्यक आहे

अती-अल्पावधी फंड्स (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) बद्दल तुम्हाला हे माहीती असणे आवश्यक आहे

म्युच्युअल फंड सही आहे?

अती-अल्पावधी फंड्सची (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) गुंतवणूक मैकाले कालावधीसह 3 ते 6 महिन्यां दरम्यान असलेल्या अल्प-मुदतीच्या कर्ज रोख्यांमध्ये (शॉर्ट टर्म डेबट्स सिक्युरिटीज) असते. बाजार जोखमी नुसार ते कमी-जोखीम असलेल्या लिक्विड फंडांपेक्षा किंचित जास्त परतावा देऊ शकतात. व्याजदरातील बदलांमुळे होणारा भांडवली धोका कमी करत अल्पावधी मध्ये जास्त परतावा देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. अल्प-मुदतीच्या कर्ज रोख्यांमध्ये (शॉर्ट टर्म डेबट्स सिक्युरिटीज) गुंतवणूक करत असल्याने दीर्घ मुदतीच्या बॉन्ड किंवा इक्विटी फंडसच्या मानाने कमी जोखीम असलेले मानले जातात.

अती-अल्पावधी (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) फंड्सची वैशिष्ट्ये

1.    अल्प-मुदतीच्या कर्ज रोख्यांमध्ये (शॉर्ट टर्म डेबट्स सिक्युरिटीज) गुंतवणूक
अती-अल्पावधी फंड्स (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) डेब्ट सिक्युरिटीज जसे की कमर्शियल पेपर्स, सर्टिफिकेट्स ऑफ डीपॉझीट्स आणि इतर मनी मार्केट इन्स्ट्रूमेंट्स मध्ये मैकाले कालावधी नुसार सहा महिन्यांपर्यंतच्या मुदतीसाठी गुंतवणूक केली जाते.

2.    जास्त (हाय) लिक्विडिटी
या फंड्समध्ये शॉर्ट टर्म फंड मॅनेजमेंटसाठी पैसे गुंतवणे आणि काढणे सहज सुलभ असते. यासाठी एक्झिट लोड नसतो.

3.    वाजवी परतावा (मॉडरेट रिटर्न्स)
जोखीम कमी ठेवत लिक्विड फंडस पेक्षा चांगला परतावा देणे हे अती-अल्पावधी फंड्सचे (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) उद्दिष्ट असते. ही एक कमी जोखीम आणि कमी परतावा देणारी गुंतवणूक आहे.

अतिरिक्त रक्कम छोट्या काळासाठी तात्पुरती गुंतवण्यासाठी अती-अल्पावधी फंड्स (अल्ट्रा-शॉर्ट डयूरेशन फंड) योग्य आहेत.

अस्वीकरण:
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे